बेळगाव शहर विकास प्राधिकरणाने (बुडा) बेळगावच्या 191.86 चौ. कि. मी. स्थानिक नियोजन क्षेत्रामध्ये भौगोलिक माहिती प्रणालीवर (जीआयएस) आधारित मास्टर प्लॅनच्या मांडणीसाठी दुसऱ्यांदा निविदा काढल्या आहेत.
स्थानिक नियोजन क्षेत्रात तपशीलवार नियोजन आणि विकास यासाठी हा मास्टर प्लॅन मार्गदर्शक ठरावा हेतू असून यासाठी क्षेत्रीय संस्थांना योजनेच्या कालावधीत आराखडा, विकास, देखभाल आणि योजनेचे कामकाज पाहणे अनिवार्य असणार आहे.
मास्टर प्लॅनमध्ये पुढील प्रस्तावांचा समावेश असणार आहे. 1) प्रादेशिक नियमावलीसह निवासी व्यावसायिक औद्योगिक कृषी मनोरंजक शैक्षणिक आणि इतर हेतू. 2) त्वरित बैठकीसाठी आणि प्रस्तावांमधील सुधारणांसाठी भावी गरजांसाठी प्रमुख आणि किरकोळ रस्ते राष्ट्रीय महामार्ग, राज्य महामार्ग आणि वाहतूक अभिसरण दर्शविणारा संपूर्ण रस्ता नमुना.
3) नव्या नागरी विकासासाठी फायदेशीर ठरणाऱ्या उद्यानं, खेळाची मैदानं आणि इतर हेतूने राखीव ठेवलेल्या जागा, सार्वजनिक खुल्या जागा, सार्वजनिक इमारती व संस्था तसेच त्या हेतूने राखीव ठेवलेल्या जागा. 4) भविष्यातील विकास आणि विस्तारासाठी चिन्हांकित केलेली ठिकाणं. 5) केंद्र सरकार राज्य सरकार नियोजन प्राधिकरण किंवा सार्वजनिक उपयोगाची हमी अथवा अन्य कोणते कायद्याने स्थापित प्राधिकरण यांच्यासाठी जमीन राखीव ठेवणे.
मास्टर प्लॅनमध्ये जुन्या ऐतिहासिक वारसा इमारती आणि परिसर सुचित झाला पाहिजे. तसेच त्यांच्या संवर्धनासाठी नियमावलीचा अंतर्भाव केला जावा. बेळगावच्या स्थानिक नियोजन क्षेत्रामध्ये (एलपीए) सरकारने नोव्हेंबर 1965 मध्ये 25 गावे सुचित केली आहेत. त्यानंतर शगनमट्टी आणि बस्तवाड गावांचा समावेश करून 5 जुलै 2012 रोजी स्थानिक नियोजन क्षेत्राची सीमा वाढविण्यात आली. बेळगावच्या स्थानिक नियोजन क्षेत्रात 27 महसूल गावे समाविष्ट असून हे क्षेत्र 191.86 चौरस कि. मी. परिसरात पसरले आहे.
गेल्या 2011 सालच्या जनगणनेनुसार बेळगाव महापालिका कार्यक्षेत्रातील लोकसंख्या चार लाख 90 हजार 45 इतकी असून यामध्ये दोन लाख 46 हजार 537 पुरुष आणि दोन लाख 43 हजार पाचशे आठ महिलांचा समावेश आहे.
मराठा लाईट इन्फंट्री संरक्षण दलाचा प्रदेश हे बेळगाव एलएपीमधील मुख्य आकर्षण आहे. सदर क्षेत्राचे सकल देशांतर्गत उत्पादन (जीडीपी) 4.4 टक्के असून सध्याचा व्यापार उद्योग पाहता हा जीडीपी 5.3 टक्क्यापर्यंत पोहोचण्याची शक्यता आहे. बेळगावचा शाश्वत आणि सर्वसमावेशक विकास हा या मास्टर प्लॅनचा उद्देश आहे.