केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांना धमकीचा कॉल केल्या प्रकरणी हिंडलगा कारागृहाच्या मुख्य अधीक्षकांसह चार जेलर आणि दोन वॉर्डन अशा 7 जणांना नोटीसा बजावण्यात आल्या आहेत. या सर्वांनी तीन दिवसात उत्तर न दिल्यास शिस्तभंगाची कारवाई केली जाईल, असे राज्याची गृहमंत्री आरग ज्ञानेंद्र यांनी सांगितले.
कोरमंगल येथील केएसआरपी मैदानावर काल शुक्रवारी आयोजित कर्नाटक राज्य पोलीस क्रीडा स्पर्धांच्या बक्षीस समारंभप्रसंगी ते बोलत होते. बेळगाव हिंडलगा कारागृहातून गेल्या 14 जानेवारीला केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या नागपुर येथील कार्यालयाला फोनवरून धमकी देण्यात आली होती. त्याप्रकरणी राज्यातही एफआयआर दाखल केला असून तपासाच्या सूचना दिल्याचे मंत्र्यांनी सांगितले.
राज्यातील सर्व कारागृहांमध्ये तीन महिन्यात’ 5 -जी सिग्नल’ ब्लॉक करण्यासाठी जॅमर बसवले जातील. करागृहातून येणाऱ्या आणि जाणाऱ्या फोन कॉल्सवर लक्ष ठेवण्यासाठी आणि प्रतिबंधात्मक, विशेषतः मोबाईल फोनची तस्करी रोखण्यासाठी वेळोवेळी बरॅक आणि कारागृह परिसरात तपासणी करण्याच्या सूचना दिल्या आहेत.
केंद्रीय मंत्री गडकरी फोन प्रकरणी हिंडलगा कारागृहातील आरोपींची कसून चौकशी करण्यात येत आहे. कारागृहाचे मुख्य अधीक्षक कृष्णकुमार तसेच चार जेलर व दोन मॉडर्न अशा 7 जणांना नोटीसी बजावल्या आहेत. त्या सर्वांनी तीन दिवसात उत्तर न दिल्यास शिस्तभंगाची कारवाई केली जाईल, असे गृहमंत्री अरग ज्ञानेंद्र यांनी स्पष्ट केले.