Monday, January 27, 2025

/

‘त्या’ घटनेला राजकीय रंग देण्याचा डाव पोलिसांनी उधळून लावला!

 belgaum

बेळगाव : बेळगाव आणि परिसरात अलीकडे मोठ्या प्रमाणात कायदा हाती घेण्यात येत असल्याच्या घटना वाढीस लागल्या आहेत. कायदा हातात घेऊन कायदा आणि सुव्यवस्था बिघडविण्याचे कार्यही काही अविघातक प्रवृत्तींकडून होत असून शनिवारी झालेला प्रकार देखील हा यापैकीच एक आहे.

हिंदुत्ववादी संघटना नेते आणि श्रीराम सेनेचे जिल्हाध्यक्ष रवी कोकितकर यांच्यावर काल सायंकाळी हिंडलगा येथे अज्ञातांनी गोळीबार केला. या गोळीबारात रवी कोकितकर यांच्यासह त्यांच्या सहकारी चालकालाही गोळी लागून हाताला दुखापत झाली.

हि घटना सायंकाळी वाऱ्यासारखी बेळगावभर पसरली आणि हिंदुत्ववादी संघटनांच्या शेकडो कार्यकर्त्यांची गर्दी जमू लागली. यादरम्यान श्रीराम सेना प्रमुख प्रमोद मुतालिक यांनी मात्र या घटनेमागे काही संघटना कार्यरत असल्याचा आरोप करत सदर घटनेचा अधिक तपास घेऊन चौकशीची मागणी केली आहे.

 belgaum

रविवारी धर्मवीर संभाजी उद्यान येथे हिंदू धर्मजागृती सभेचे आयोजन करण्यात आले होते. यामुळे या सभेच्या पार्श्वभूमीवर तयारी करण्यासाठी रवी कोकितकर आणि त्यांचे सहकारी फिरत होते. या सभेच्या पार्श्वभूमीवर हा हल्ला झाल्याचा प्राथमिक अंदाज अनेक हिंदुत्ववादी संघटनांच्या कार्यकर्त्यांनी लावला.Cop

सुरुवातीला जिल्हा रुग्णालय आणि त्यानंतर केएलईएस रुग्णालयात रवी कोकितकर आणि त्यांच्या सहकारी चालकाला उपचारासाठी दाखल केल्याची माहिती मिळताच केएलईएस समोरही कार्यकर्त्यांनी मोठी गर्दी केली. यावेळी कायदा व सुव्यवस्था विभागाचे डीसीपी रवींद्र गडादि, ग्रामीणचे एसीपी एस. पी. गिरीश, कॅम्पचे निरीक्षक धर्मट्टी, वडगावचे निरीक्षक श्रीनिवास हंडा, उपनिरीक्षक लक्काप्पा जोडट्टी यांनी घटनास्थळी धाव घेतली. रुग्णालय परिसरात चोख बंदोबस्त ठेवला. यावेळी शेकडो कार्यकर्त्यांनी गर्दीही केली. झालेल्या घटनेला राजकीय रंग देण्याचा प्रयत्नही झाला. मात्र पोलिसांनी अवघ्या १८ तासातच घटनेचा छडा लावत आरोपींना गजाआड केले.Abhijit bhatkande

काल सायंकाळपासून या घटनेनंतर तणावपूर्ण परिस्थिती निर्माण करण्याचा प्रयत्न झाला. मात्र कोकितकर यांच्यावर झालेला हल्ला हा वैयक्तिक द्वेषापोटी आणि पूर्ववैमनस्यातून झाल्याचे पोलीस तपासात उघड झाले. अभिजित भातकांडे, राहुल कोडचवाड, जोतिबा मुतगेकर अशा तीन आरोपींना पोलिसांनी अटक केली आहे. यामधील अभिजित भातकांडे हे बांधकाम व्यावसायिक असून अभिजित भातकांडे आणि रवी कोकितकर यांच्यात २०२० साली वैमनस्य निर्माण झाले.

अभिजित भातकांडे यांच्यावर १ जानेवारी २०२० रोजी जीवघेणा हल्ला झाला. यावेळी रवी कोकितकर यांच्यावर प्रमुख आरोप होता. काल झालेली घटना हि जुन्या आर्थिक वादाच्या पार्श्वभूमीवर झाली असून या हल्ल्यासाठी अभिजित भातकांडे यांनी गावठी पिस्तुलाचा वापर केल्याचे पोलीस तपासात उघड झाले आहे. या घटनेनंतर शहर पोलीस आयुक्त डॉ. एम. बी. बोरलिंगय्या यांनी हिंदुत्ववादी संघटनेच्या कार्यकर्त्यांना आणि समस्त जनतेला कोणत्याही अफवा न पसरविण्याचे आवाहन केले. तसेच कोणत्याही अफवांवर विश्वास न ठेवता कायदा व सुव्यवस्था बिघडणार नाही याची दक्षता घेण्याचेही आवाहन केले.

 belgaum

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.