Thursday, January 9, 2025

/

फेब्रुवारीत भरवणार कुंभार समाजाचा मेळावा

 belgaum

खानापूर: दर पाच वर्षांनी खानापूर तालुका पातळीवर संत गोरा कुंभार समाज विकास मंडळातर्फे महामेळावा फेब्रुवारीत भरवण्याचा निर्णय रविवारी झालेल्या वार्षिक बैठकीत घेण्यात आला. या बैठकीचे आयोजन फुलेवाडी येथील आयोध्या नगर मध्ये करण्यात आले होते.

या बैठकीच्या अध्यक्षस्थानी भैरू कुंभार होते. बैठकीच्या प्रारंभी सचिव परशराम पालकर यांनी बैठकीचा उद्देश स्पष्ट केला. या बैठकीमध्ये मागील सभेच्या इतिवृत्तास मंजुरी देणे, अहवालाच्या अंदाजपत्रकाच्या जमाखर्चास मंजुरी देणे, वार्षिक सभासद वर्गणी निश्चित करणे, पाच वर्षातून एकदा भरवण्यात येणारा महामेळावा तालुका पातळीवर भरवणे, दाम दुप्पट योजनेअंतर्गत ठेवण्यात आलेल्या रकमेचा विनिमय करणे, 2019 पासून 2022 पर्यंत सातवी, दहावी, बारावी व पदवी विद्यार्थ्यांना गुणवंत विद्यार्थ्यांचा गौरव करणे, समाजातील निवृत्त शिक्षक, आदर्श शिक्षक पुरस्कार विजेते शिक्षक, माजी सैनिक, विद्यमान ग्रामपंचायत सदस्य तसेच इतर सेवेतून मुक्त झालेले कर्मचारी यांचा सत्कार करणे. या विषयावर चर्चा करण्यात आली.

याबरोबर कुंभार कला वाढीस लागण्यासाठी गावागावात प्रशिक्षण राबवून इलेक्ट्रिक व्हील वितरण करणे, हुशार विद्यार्थ्यांना शैक्षणिक मदत करणे, याबाबत सविस्तर चर्चा करण्यात आली.

या बैठकीला खजिनदार नागाप्पा उत्तुरकर, सचिव परशराम पालकर, सदस्य नारायण कुंभार, ज्योतिबा कुंभार, यशवंत पालकर, दुलाजी कुंभार, महेश चंदगडकर, विलास कुंभार, सातेरी कुंभार, सोमनाथ कुंभार उपस्थित होते.

 belgaum

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.