महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी चिक्कमंगळूर येथील एका कार्यक्रमात आपल्या भाषणाची सुरुवात कानडीतून केल्याने सखेद आश्चर्यासह तीव्र नाराजी व्यक्त होत आहे.
कांही दिवसांपासून सीमावाद चांगलाच तापला असताना महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नुकतीच चिक्कमंगळूर येथील एका कार्यक्रमाला हजेरी लावल्याबद्दल अनेकांनी सोशल मीडियावर नाराजी व्यक्त केली आहे.
त्याचप्रमाणे सदर कार्यक्रमात उपमुख्यमंत्री फडणवीस यांनी चक्क कानडी भाषेतून भाषणाला सुरुवात केल्यामुळे तर अधिकच नापसंती व्यक्त केली जात आहे. चिक्कमंगळूर येथे आयोजित केलेल्या सांस्कृतिक महोत्सवात बोलताना महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी भाजप आमदार सी. टी. रवी यांच्या कार्याचे कौतुक केले.
तसेच रवी यांच्या आग्रहास्तव आपण या कार्यक्रमाला होकार दिल्याचे त्यांनी स्पष्ट केले. मराठीसह कन्नड भाषा ही प्राचीन आणि समृद्ध भाषा आहे. दोन्ही भाषेतील साहित्य लोकांना दिशा देणारे आहे, असे मत त्यांनी व्यक्त केले होते. तसेच त्यांनी कन्नडमधून सुरुवात केलेले भाषण सोशल मीडियावर व्हायरल झाले आहे.