बेळगावचे पोलीस उपायुक्त रवींद्र काशिनाथ गडादी (आयपीएस) यांची तडकाफडकी बदली करण्यात आली आहे. तसेच त्यांच्या जागी म्हैसूरचे पोलीस अधीक्षक आणि पोलीस ट्रेनिंग स्कूलचे प्राचार्य शेखर एच. तिरकन्नावर (आयपीएस) यांची नियुक्ती करण्यात आली आहे.
बेळगावचे कायदा व सुव्यवस्था विभागाचे पोलीस उपायुक्त रवींद्र काशिनाथ गडादी यांची तडकाफडकी बेंगलोर शहर कमांड सेंटरच्या पोलीस उपायुक्तपदी पुढील आदेशापर्यंत बदली झाली आहे.
बेंगलोर शहर, कमांड सेंटरचे पोलीस उपायुक्त के. रामराजन यांची अन्यत्र बदली झाल्याने त्यांच्या जागी गडादी यांची नेमणूक करण्यात आली आहे.
रवींद्र गडादि यांनी या अगोदर बेळगाव जिल्ह्याचे अतिरिक्त पोलीस अधीक्षक म्हणून देखील काम केले आहे. जानेवारी 2022मध्ये त्यांनी बेळगाव शहराचे पोलीस उपायुक्त म्हणून कार्यभार स्वीकारला होता गेल्या वर्षभरात त्यांनी डी सी पी म्हणून अनेक वेगवेगळी कार्ये केली होती