बेळगाव शहर परिसरात आज सोमवारी पहाटेपासून थंडीचा कडाका अधिकच वाढला आहे. शहराचे सर्वसामान्य तापमान सकाळी वजा 4 डिग्री सेल्सिअस इतके कमी होऊन किमान 10 डिग्री सेल्सिअस इतके नोंदविले गेले आहे.
देशभरात थंडीची लाट आली असून बेळगावही त्यापासून अपवाद राहिलेले नाही. गेल्या कांही दिवसात वाढली असून पहाटे थंडीचा कडाका वाढला. बेळगाव शहराचे किमान तापमान 27.5 डिग्री सेल्सिअस इतकी आहे. मात्र सध्या हिवाळ्याचा मौसम असल्यामुळे तापमान वारंवार घसरत आहे.
आज ते अधिकच घसरल्याचे सकाळपासून पडलेल्या बोचऱ्या थंडीमुळे जाणवत आहे. सध्या शहराचे किमान तापमान 10 डिग्री सेल्सिअस इतके आहे हे सर्वसामान्य किमान तापमानापेक्षा 4 डिग्री सेल्सिअस कमी आहे.
त्यामुळे स्वच्छ सूर्यप्रकाश असला तरी हवेत गारवा जाणवत आहे. परिणामी दिवसाढवळ्या विशेष करून वयोवृद्ध नागरिक व लहान मुलांच्या अंगावर उबदार कपडे पहावयास मिळत आहेत. हिवाळ्यामुळे ग्रामीण भागात शेकोट्या पेटवण्याचे सत्र तर सुरू झाले आहे, ते आज जास्त प्रमाणात दिसून येत होते.
दरम्यान, मागील काही दिवसांपासून सातत्याने वातावरणात बदल होत असल्याने याचा परिणाम पिकांवर होत आहे. विशेष करून कडधान्य पिकांवर किडीचा प्रादुर्भाव वाढल्याने शेतकऱ्यांची चिंता वाढली आहे. गेल्या नोव्हेंबर महिन्यापासून वातावरण बदलाचा परिणाम पिकावर होऊ लागला आहे त्यामुळे कडधान्य पिकाची वाढ खुंटली आहे. परिणामी यंदा कडधान्य उत्पादनात मोठी घट होण्याची भीती व्यक्त होत आहे.