प्रवास करणाऱ्या परिवहन मंडळाच्या बसला भर रस्त्यात शॉर्टसर्किटने अचानक आग लागण्याची घटना हत्तरगी (ता. हुक्केरी) येथील राष्ट्रीय महामार्ग क्र. 4 वर घडली. मात्र सुदैवाने बसमधील सर्व प्रवासी सुखरूप आहेत.
हत्तरगी गावानजीक राष्ट्रीय महामार्ग क्र. 4 वर कर्नाटक राज्य परिवहन मंडळाच्या एका बसला भर रस्त्यात शॉर्टसर्किटने आग लागली. प्रसंगावधान राखून चालक आणि वाहकाने सर्व प्रवाशांना बस मधून बाहेर पडण्यास सांगितल्यामुळे सुदैवाने कोणालाही इजा झाली नाही सदर प्रकाराची माहिती मिळताच अग्निशामक त्याला आमच्या जवानांनी तात्काळ घटनास्थळी घाव घेऊन आग आटोक्यात आणली. मात्र तोपर्यंत बसचे छत वगैरे वरील भाग आगीत बेचिराख झाला होता. आगीच्या या घटनेमुळे हत्तरगी येथील सदर मार्गावरील दोन्ही बाजूची वाहतूक काही काळ ठप्प होऊन वाहतूक कोंडी झाली होती. सदर घटनेची यमकनमर्डी पोलीस ठाण्यात नोंद झाली आहे.