निवडणुकीच्या दृष्टिकोनातून काही फायदा होत असेल तर राजकारणी सर्वप्रथम त्याठिकाणी जाऊन पोहोचतो. मात्र सर्वसामान्य जनतेच्या मूलभूत गरजांसाठी मात्र प्रत्येकाला ओरडून लक्ष वेधावे लागते, हि दुर्दैवाची बाब आहे. कर्नाटकात सध्या विधानसभा निवडणुकीच्या दृष्टिकोनातून मतदारांना आकर्षित करण्यासाठी अनेक प्रलोभने देण्यात येत आहेत. मात्र शालेय विद्यार्थ्यांच्या बससुविधेकडे मात्र कोणत्याही लोकप्रतिनिधींचे लक्ष नसल्याने ग्रामीण मतदार संघाच्या आमदारांविरोधात सोशल मीडियावर रोष व्यक्त करण्यात येत आहे.
ग्रामीण भागातील अनेक भागात आजही विद्यार्थ्यांची बससाठी तारांबळ उडत आहे. बेळगुंदीसह अन्य गावांसाठी सकाळच्या सत्रात परिवहन मंडळाची बस सेवा उपलब्ध नसल्याने विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होत आहे. बस सेवा उपलब्ध नसल्याने बेळगाव ग्रामीणच्या आमदारांचे दुर्लक्षच कारणीभूत असल्याचा आरोप करत त्यांचा जाहीर निषेध करण्यात आला असून तशा आशयाचे पत्रक सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाले आहे.
बेळगुंदी भागातील बस सेवेकडे ग्रामीण आमदारांचे दुर्लक्ष ‘जाहीर निषेध’ या शीर्षकाखाली सध्या सोशल मीडियावर एक पत्रक प्रसिद्धी देण्यात आले आहे. या पत्रकाद्वारे बेळगुंदी आणि या भागातील मुलांच्या शैक्षणिक हितासाठी सकाळच्या सत्रात तात्काळ बससेवा सुरू न केल्यास त्याचे परिणाम बेळगाव ग्रामीणच्या विद्यमान आमदार आणि इच्छुक उमेदवारांना आगामी विधानसभा निवडणुकीत भोगावे लागतील, असा सज्जड इशारा देण्यात आला आहे.
बेळगुंदी भागातील बेळगुंदी, येळेबैल, राकसकोप, सोनोली बोकनूर आदी गावातून शेकडो विद्यार्थी बेळगावला प्राथमिक व उच्च शिक्षणासाठी प्रवास करत असतात. तथापि सकाळी 7 वाजल्यापासून 10 वाजेपर्यंत या विद्यार्थ्यांना शाळेला जाण्यासाठी बेळगुंदी भागातून एकही सरकारी बस नसल्याने विद्यार्थ्यांचे शैक्षणिक भवितव्य टांगणीला लागलेले आहे. याकडे बेळगाव ग्रामीणच्या आमदारांनी साफ दुर्लक्ष केले असून त्या फक्त कुकर, साड्या आणि डबे वाटप करण्यात व्यस्त असतात. त्यांच्या या कृतीतून विद्यार्थ्यांची शैक्षणिक प्रगती व्हावी याकडे त्या जाणून बुजून दुर्लक्ष करत असल्याचे जाणवत आहे.
भाजपच्या माजी आमदारानी देखील वाढदिवसाच्या निमित्ताने भेट वस्तू वाटल्या होत्या भेट वस्तू वाटण्या सोबत राज्यात सत्तेत असलेल्या पक्षा कडून विद्यार्थ्यांची बस सेवा सुरळीत करून घ्यावी म्हणजे ग्रामीण भागातील लोकांची अडचण दूर होईल अशीही मागणी वाढू लागली आहे
तेंव्हा त्यांच्या या कृतीचा या भागातून निषेध करण्यात येत आहे. जर ही समस्या दूर झाली नाही तर येत्या निवडणुकीत त्याचे परिणाम त्यांना भोगावे लागतील या शंका नाही. तसेच जे जे इच्छुक उमेदवार आहेत, त्यांनी देखील या समस्येकडे दुर्लक्ष करून चालणार नाही. जर त्यांना या भागातील मताधिक्य हवे असल्यास त्यांनीही समक्ष सकाळी 7 ते 10 वाजेपर्यंत बेळगुंदी भागात दौरा करून समस्येची पाहणी करावी आणि समस्या दूर करावी., अशा आशयाचा तपशील सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या जाहीर निषेध पत्रकात नमूद आहे.
व्हायरल झालेल्या पोस्ट चे लिंक असे आहे
https://m.facebook.com/story.php?story_fbid=pfbid0aQnxQh4B2fuhAan5hquqwtMzxTnAvXVvJqizVYX63cGaVpwCSVMVeinAnB5n3z3Wl&id=100003937580703&mibextid=Nif5oz