अखेर बेळगाव महानगरपालिकेच्या महापौर आणि उपमहापौर पदाच्या निवडणुकीचा मुहूर्त लागला असून सदर निवडणूक येत्या 6 फेब्रुवारी 2023 रोजी होणार असल्याचे प्रादेशिक आयुक्त डाॅ. महांतेश हिरेमठ यांनी कळविले आहे.
बेळगाव महापालिकेची निवडणूक होऊन जवळपास सव्वा वर्षे उलटले आहे. मात्र महापौर आणि उपमहापौर निवडणुकीचा मुहूर्त कांही लागत नव्हता. यासंदर्भात आमदारांनीही यापूर्वी दोन वेळा निवडणूक होणार असल्याचे सांगितले होते.
याखेरीज 31 जानेवारीला ही निवडणूक होणार असल्याचे जाहीर करण्यात आले होते. मात्र आता 31 जानेवारीची निवडणूक पुढे ढकलण्यात आली असून ती आता 6 फेब्रुवारीला निश्चित करण्यात आल्याचे प्रादेशिक आयुक्त डाॅ. महांतेश हिरेमठ यांनी कळविले आहे.
बेळगाव महापौर पदासाठी सामान्य महिला तसेच उपमहापौर पदासाठी ओबीसी महिला असे आरक्षण यापूर्वी जाहीर करण्यात आले आहे. आता निवडणुकी संदर्भात अधिसूचना जारी करण्यात येणार असल्याचे प्रादेशिक आयुक्तांनी स्पष्ट केले आहे.