नागरी हवाई वाहतूक महासंचालनालयाने (डीजीसीए) जाहीर केलेल्या माहितीनुसार गेल्या नोव्हेंबर महिन्यात बेळगाव विमानतळाने एकूण 23,243 प्रवाशांचे स्वागत केले आहे.
बेळगाव विमानतळावरून बेंगलोरसह मुंबई, नागपूर, हैदराबाद, दिल्ली, अहमदाबाद, जोधपुर, सुरत, इंदोर आणि तिरुपती या शहरांसाठी विमानसेवा उपलब्ध आहे. या मार्गांपैकी गेल्या नोव्हेंबर महिन्यात बेळगाव ते बेंगलोर हा सर्वात व्यस्त मार्ग ठरला असून एकूण 7,606 प्रवाशांनी या मार्गावर प्रवास केला आहे.
शहराच्या जोडीनुसार नोव्हेंबर 2022 मधील नियोजित देशांतर्गत विमान सेवेद्वारे बेळगावला आगमन आणि प्रस्थान केलेल्या प्रवाशांची आकडेवारी (तात्पुरती) पुढील प्रमाणे आहे.
बेळगाव ते बेंगलोर :आगमन 3878 -प्रस्थान 3728, बेळगाव ते दिल्ली : 2282 -2376, बेळगाव ते हैदराबाद :1873 -1915, बेळगाव ते मुंबई :1028 -1044, बेळगाव ते अहमदाबाद :903 -875, बेळगाव ते जोधपुर :434 -406, बेळगाव ते सुरत :368 -330, बेळगाव ते इंदोर :349 -337, बेळगाव ते तिरुपती :309 -347, बेळगाव ते नागपूर :208 -253.