बेळगावचा एक्वेरियस स्विमिंग क्लब आणि स्विमर्सक्लबचा जलतरण खेळाडू अमन सुनगार याची 8 ते 11 फेब्रुवारी 2023 दरम्यान मध्य प्रदेश भोपाळ, येथे होणाऱ्या खेलो इंडिया युथ गेम्स 2023 निवड झाली आहे .या स्पर्धेसाठी अमन सुनगार यांची कर्नाटक जलतरण संघात निवड झाली आहे.
नुकत्याच संपन्न झालेल्या दक्षिण विभागीय राष्ट्रीय जलतरण स्पर्धेत 200 मीटर बॅकस्ट्रोक स्पर्धेत अमनने केलेल्या अप्रतिम कामगिरीमुळे
अकरा वर्षांचा नवा नॅशनल मीट रेकॉर्ड मोडून काढला त्यामुळे त्याला खेलो इंडिया 2023साठी निवड झाली आहे.
अमन हा बेळगाव येथील सुवर्णा जे एन एम सी स्विमिंग पूल (ऑलिंपिक) येथे पोहण्याचे प्रशिक्षण घेत आहे प्रशिक्षक अक्षय शेरेगर, अजिंक्य मेंडके, नितीश कुडूचकर आणि गोवर्धन काकतकर यांच्या मार्गदर्शनाखाली तो तयारी करत आहे.
डॉ. प्रभाकर कोरे (चेअरमन, केएलई सोसायटी) यांनी अभिनंदन करत अमनचे पुष्पगुच्छ देऊन त्याचा गौरव केला आणि त्याच्या व त्याच्या प्रशिक्षकांना त्याच्या पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.
बेळगाव स्पोर्ट्स क्लबचे अविनाश पोतदार, श्रीमती. मानेक कपाडिया, श्रीमती. लता कित्तूर, उमेश कलघटगी, सुधीर कुसाने, प्रसाद तेंडोलकर यांचेही त्याला मार्गदर्शन मिळाले आहे.