बेळगाव सह सीमाभाग महाराष्ट्रात विलीन तेंव्हाच बाळासाहेबांना खरी श्रद्धांजली मिळेल असे मत समितीचे युवा नेते आर एम चौगुले यांनी व्यक्त केले.बेळगाव जिल्हा शिवसेना सीमाभाग यांच्यातर्फे हिंदुहृदयसम्राट मा. बाळासाहेब ठाकरे यांची जयंती आज सोमवारी सकाळी उत्साहात साजरी करण्यात आली.त्यावेळी ते प्रमुख अतिथी म्हणून बोलत होते.ळ
टिळक चौक येथे आयोजित सदर कार्यक्रमास प्रमुख रामा शिंदोळकर व साहित्यिक गुणवंत पाटील उपस्थित होते. प्रारंभी स्वागत व प्रास्ताविकानंतर प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते दिवंगत मा. बाळासाहेब ठाकरे यांच्या प्रतिमेचे पूजन करून अभिवादन करण्यात आले.
शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे विचार मूलभूत असल्याने ते कायमचे जीवंत राहतील.शिवसेना हा तलगला पर्यंत पोचलेला पक्ष आहे.बेळगाव सीमा लढ्यातील बाळासाहेबांचे योगदान महत्वाचे होते म्हणूनच हा प्रदेश महाराष्ट्रात जाण्याची गरज आहे असे जेष्ठ साहित्यिक गुणवंत पाटील यांनी व्यक्त केले.
शिवसेना उपजिल्हाप्रमुख बंडू केरवाडकर, उपशहर प्रमुख राजू तुडयेकर व तालुका प्रमुख सचिन गोरले यांच्या हस्ते प्रमुख पाहुण्यांचा सत्कार करण्यात आला. ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त उपस्थित मान्यवरांनी समयोचीत विचार व्यक्त केले.
त्याचप्रमाणे दिवंगत बाळासाहेब ठाकरे यांच्यासह उद्धव ठाकरे यांनी जोपर्यंत सीमाप्रश्न सुटत नाही तोपर्यंत शिवसेना सीमावासियांच्या पाठीशी राहील असे जे सांगितले आहे त्यानुसार कार्यरत राहण्याचा निर्धार यावेळी व्यक्त करण्यात आला.
जयंती कार्यक्रमानंतर मिठाईचे वाटप करण्यात आले. याप्रसंगी चंद्रकांत कोंडुसकर, शिवसेना शहर प्रमुख दिलीप बैलूरकर, उपशहर प्रमुख प्रकाश राऊत, राजकुमार बोकडे, संघटक तानाजी पावशे, सुनील देसुरकर, रविंद्र जाधव, संजय सुभाजी, लोकमान्य टिळक चौक रिक्षा ओनर्स असोसिएशनचे अध्यक्ष राजू मोरे, संजय चतुर, विजय मुरकुटे, महेश टंकसाळी, प्रदीप सुतार, महांतेश अध्यापगोळ, नरेश निलजकर, बळवंत शिंदोळकर, मधुरेश काकतकर, निलेश केरवाडकर, सनी रेमानाचे, संजय देसाई, शिवाजी चौगुले, अनिल मुतगेकर, अनिल हट्टीकर, अब्दुल पाडगावकर, परशराम काकतकर आदींसह शिवसैनिक व नागरिक उपस्थित होते.