बेळगाव : मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांनी येत्या २४ तासात पंचमसाली लिंगायत समाजाला २ए श्रेणीत आरक्षण देण्यासंदर्भात पुढील कारवाई करावी, अशी मागणी आमदार बसनगौडा पाटील यत्नाळ यांनी केली.
बेळगावमध्ये गांधी भवन येथे झालेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते. पंचमसाली समाजाला २डी श्रेणीत आरक्षण देण्यासंदर्भात निर्णय झाला.
मात्र पंचमसाली समाजाला न्याय मिळाला का? असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला. येत्या २४ तासात आरक्षणप्रश्नी निर्णय न झाल्यास मुख्यमंत्री ज्या मतदार संघातून निवडणुकीसाठी उभे राहतील त्या शिग्गाव मतदार संघातून आंदोलनाला सुरुवात करू असा इशारा त्यांनी दिला.
आरक्षणप्रश्नी मुख्यमंत्र्यांना यत्नाळांनी लक्ष्य केले. मुख्यमंत्र्यांनी आरक्षणप्रश्नी आमची दिशाभूल केली. माजी मुख्यमंत्री येडियुरप्पा यांचे म्हणणे ऐकून आमची फसवणूक केली.
मात्र आरक्षणप्रश्नी निर्णय घेऊन मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांनी आपले राजकीय भवितव्य ठरवावे, असा इशाराही बसनगौडा पाटील यत्नाळ यांनी दिला.