अमूर्त संस्कृतीचे जतन करणे हे मोठे आव्हानात्मक कार्य असते. अस्पर्शीक प्रामुख्याने तोंडी आणि कर्णोपकर्णी असणाऱ्या या संस्कृतीचे जतन करण्यासाठी देशाच्या सांस्कृतिक मंत्रालयाने पुढाकार घेतला आहे.
मंत्रालयाने मिशन ऑन कल्चरल मॅपिंग (एनएमसीएम) हा कार्यक्रम हाती घेतला असून त्यासाठी बेळगाव जिल्ह्यातील देशनूर गावाची निवड करण्यात आली आहे.
सांस्कृतिक खात्याचे केंद्रीय मंत्री जी. कृष्णा रेड्डी यांनी लोकसभेत ही माहिती दिली. देशनूर वगळता कर्नाटकातील शिमोगा जिल्ह्यातील मत्तुर, चिकबेळ्ळापुरातील विधुराश्वथ आणि गदग जिल्ह्यातील अक्कीगुंड यांची एनएमसीएम कार्यक्रमासाठी निवड करण्यात झाली आहे.
सदर कार्यक्रमांतर्गत निवड झालेल्या गावांच्या ऐतिहासिक तथ्यांचा ई-कॉमर्स प्लॅटफॉर्म विकसित करणे हे सांस्कृतिक मंत्रालयाचे उद्दिष्ट आहे. याव्यतिरिक्त राष्ट्रीय नोंदणी ठेवणे आणि भारतातील गावांमधील कलाकार व त्यांनी जतन केलेली कला यांचा परस्पर संवादी माहितीकोष (इंटरॅक्टिव्ह डाटाबेस) ठेवणे, कलाकारांना वेगळी सांकेतिक ओळख देणे, हा देखील मंत्रालयाचाउद्देश असल्याचे केंद्रीय सांस्कृतिक मंत्री रेड्डी यांनी स्पष्ट केले.
सदर मिशनचा डाटाबेस पुढील घटकांवर आधारित असेल. देशातील गावांमधील कलाकार आणि त्यांनी जतन केलेली कला यांची राष्ट्रीय नोंदणी व परस्पर संवादी माहितीकोष, कलाकारांना वेगळी सांकेतिक ओळख ई-कॉमर्स प्लॅटफॉर्म, देशातील कलाकार आणि कारागिरांसाठी असलेल्या भारत सरकारच्या सर्व कल्याण योजनांमध्ये एकेरी सांस्कृतिक सेवा प्रदाता प्लॅटफॉर्म उपलब्ध करणे,
कला हस्तकला आणि संस्कृती दर्शविणारे गावांचे आभासी संग्रहालय. सदर कार्यक्रमासाठी आतापर्यंत देशातील 12000 गावांचे मॅपिंग झाले असल्याची माहिती केंद्रीय सांस्कृतिक मंत्र्यांनी दिली.