Friday, November 15, 2024

/

सौंदत्ती यात्रेसाठी मास्क सक्तीचा मौखिक आदेश

 belgaum

सौंदत्ती यात्रेला जाणाऱ्या भाविकांना यंदा फेस मास्कची सक्ती असणार असून याबाबतचा मौखिक आदेश सौंदत्ती मंदिर प्रशासनाला प्राप्त झाला असला तरी आदेशाच्या पूर्ण अंमलबजावणीसाठी लेखी आदेशाची प्रतीक्षा केली जात आहे.

सौंदत्ती येथील श्री रेणुका देवीची मुख्य यात्रा येत्या 6 जानेवारी 2023 रोजी होणार आहे. तत्पूर्वी 28 डिसेंबरपासून बेळगावचे भावीक यात्रेच्या निमित्ताने सौंदत्ती डोंगराला रवाना होणार आहेत. सौंदत्ती यात्रेनिमित्त सुमारे 15 ते 20 दिवस डोंगरावर लाखो भाविकांची गर्दी असणार आहे. सध्या चीनसह इतर कांही देशांमध्ये कोरोनाने पुन्हा डोके वर काढले आहे. त्यामुळे खबरदारीचा उपाय म्हणून कर्नाटकात कोरोनाची नियमावली पुन्हा एकदा जाहीर केली जात आहे.

सौंदत्ती यात्रेत भाविकांची होणारी गर्दी लक्षात घेऊन सध्या तातडीचे मौखिक आदेश जिल्हाधिकाऱ्यांनी सौंदत्ती मंदिर प्रशासनाला बजावले असून त्यात मास्कचा वापर भाविकांना करण्यास सांगण्याचे बजावले आहे. त्यानुसार भाविकांना फेसमास्क वापर करावा याबाबतची सूचना केली जात असल्याचे सौंदत्ती रेणुका मंदिराचे सीईओ एस. पी. जिरगाळ यांनी सांगितले. बेळगाव येथील हिवाळी अधिवेशन आटोपताच फेसमास्क, सॅनिटायझर तसेच कोरोना संबंधी नियमावलीचे पालन करण्याचे स्पष्ट लेखी आदेश बजावले जाणार आहेत.

 belgaum

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.