केंद्रीय गृहमंत्र्यांना सांगून बेळगावात मराठी भाषिक महामेळाव्याच्या पार्श्वभूमीवर कर्नाटक पोलिसांनी धरपकड करून स्थानबद्धतेत ठेवलेल्या मराठी भाषिक नेते आणि कार्यकर्त्यांची लवकरात लवकर सुटका करावी, अशी विनंती राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार रोहित दादा पवार यांनी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्र्यांकडे केली आहे.
महाराष्ट्र विधानसभेमध्ये आज सोमवारी राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार रोहित दादा पाटील यांनी बेळगावचा मुद्दा उचलला. बेळगावात महाराष्ट्र एकीकरण समितीतर्फे आज आयोजित मराठी भाषिकांच्या महामेळाव्याला परवानगी नाकारून कर्नाटक पोलिसांनी समिती नेते व मराठी भाषिकांची धरपकड करण्यात आले त्यांना स्थानबद्धती ठेवले आहे.
हा मुद्दा राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार रोहित दादा पवार यांनी महाराष्ट्र विधानसभेत उठविला.आमदार रोहित दादा पवार यांनी बेळगाव जेंव्हा कर्नाटक सरकारचे हिवाळी अधिवेशन घेतले जाते. त्यावेळी प्रथेनुसार महाराष्ट्र एकीकरण समितीचे नेते, पदाधिकारी व कार्यकर्ते त्या ठिकाणी एक प्रतिकात्मक आंदोलन करतात. त्यानुसार आज आंदोलन होणार होते. मात्र एक तर त्यासाठीची परवानगी तेथील सरकारने नाकारली आहे.
दुसरी गोष्ट म्हणजे आंदोलन करते नेते व कार्यकर्त्यांना ताब्यातही घेतले आहे. माझी मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्र्यांना विनंती आहे. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांना तुम्ही भेटला होता.
महाराष्ट्रातील महाविकास आघाडीच्या नेत्यांची त्यांच्याशी बैठक झाली होती असे सांगून आपण अमित शहा यांच्याशी बोलून बेळगावात पोलिसांनी ताब्यात घेतलेल्या लोकांची लवकरात लवकर सुटका करावी, अशी विनंती आमदार पवार यांनी केली