केंद्रीय गृहमंत्र्यांसोबत झालेली बैठक सीमाप्रश्ना संदर्भात नव्हतीच तर केवळ कायदा-सुव्यवस्थे संदर्भात असल्याचं सांगत कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांनी महाराष्ट्र सरकारचा खोटारडेपणा उघड केला आहे.
आपले मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांनी चुकीची माहिती देऊन महाराष्ट्राची दिशाभूल का केली? असा प्रश्न आमदार रोहित पवार यांनी विचारला आहे.
आपल्या फेसबुक वर पोस्ट करत त्यांनी काल कर्नाटकाचे मुख्यमंत्री बसवराज बोम्माई यांनी दिल्ली बैठकी संबंधी कर्नाटक विधासभेत घुमजाव केला होता त्याचा रोहित पवार यांनी समाचार घेत महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांना सवाल विचारला आहे.
कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांची विधाने बघता काही गोष्टी स्पष्ट होतात. ते त्यांच्या केंद्रीय नेत्यांना महाराष्ट्राचे नेते ज्याप्रमाणे घाबरून आहेत, त्याप्रमाणे घाबरत नाहीत किंवा महाराष्ट्राच्या नेत्यांना जो केंद्रीय सपोर्ट नाही तो छुपा केंद्रीय सपोर्ट त्यांना आहे. असेही रोहित पवार यांनी पुढे म्हटले आहे.
येणाऱ्या निवडणुकीत तिकीट मिळणार नसल्याचा अंदाज आल्याने ते भावनिक विषय छेडून आपली बाजू भक्कम करत आहेत.पण ते काही असो महाराष्ट्र मात्र महाराष्ट्र सरकारप्रमाणे गप्प बसणार नाही,हे बोम्मई यांनी लक्षात घ्यायला हवे असेही त्यांनी नमूद केलं