शाकंबरी पोर्णीमेनिमित्त दरवर्षीप्रमाणे यावर्षीही राजहंसगड येथील भाविक येत्या बुधवार दि. 4 जानेवारी 2023 रोजी गावातून सौंदत्ती यल्लम्मा डोंगराकडे रवाना होणार आहेत.
सौंदत्ती यल्लम्मा डोंगराकडे रवाना झाल्यानंतर शुक्रवार दि. 6 जानेवारी रोजी पडल्या भरण्याचा कार्यक्रम होणार आहे. पुढे शनिवार दि. 7 रोजी भंडारा उधळण, तर रविवार दि. 8 रोजी बाजार होईल.
त्यानंतर मंगळवार दि. 10 जानेवारी रोजी गावात पडल्या (मारग मळण्याचा) भरण्याचा कार्यक्रम होऊन यात्रेची सांगता होणार आहे. तरी याची भाविकांनी नोंद घ्यावी असे श्री सिद्धेश्वर देवस्थान पंच कमिटीकडून कळविण्यात आले आहे. तसेच यल्लम्मा डोंगराला जाणाऱ्या भाविकांनी सिप्पय्या बुर्लकट्टी यांच्याकडे नावं नोंद करावीत, असे आवाहनही करण्यात आले आहे.
श्रीक्षेत्र सौंदत्ती येथील यात्रोत्सव कार्यक्रम निश्चित
येळ्ळूर येथील श्री चांगळेश्वरीदेवी मंदिर विश्वस्त मंडळ आणि कार्यकारणीच्या नुकत्याच झालेल्या बैठकीत श्रीक्षेत्र सौंदत्ती यल्लमा डोंगरावरील यात्रोत्सव कार्यक्रम निश्चित करण्यात आला.
येळ्ळूर (ता. जि. बेळगाव) येथील श्री चांगळेश्वरीदेवी मंदिर विश्वस्त मंडळ आणि कार्यकारणीची बैठक काल मंगळवारी नारायण कल्लाप्पा कंग्राळकर यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली. सदर बैठकीत यल्लमा डोंगरावरील श्रीक्षेत्र सौंदत्ती येथील यात्रा उत्सव कार्यक्रमाबाबत चर्चा करून तो निश्चित करण्यात आला. त्यानुसार शुक्रवार दि. 6 जानेवारी 2023 रोजी डोंगरावरील पडल्या भरण्याचा कार्यक्रम होईल. त्यानंतर मंगळवार दि. 10 जानेवारी 2023 रोजी येळ्ळूर येथील मळ्यातील यात्रा पार पाडली जाईल. काल झालेल्या बैठकीस श्री चांगळेश्वरीदेवी मंदिर विश्वस्त मंडळ आणि कार्यकारणीचे सर्व सदस्य उपस्थित होते.