माजी मंत्री रमेश जारकीहोळी यांनी आपल्या समर्थक असलेल्या विधानसभेसाठी भाजपच्या उमेदवारीसाठी इच्छुक असलेल्या दोन्ही उमेदवारांना सोबत घेत दिल्ली नंतर नागपूर वारी केलेली आहे.
बेळगाव ग्रामीण विधानसभा मतदासंघांतून मराठा समाजातील हिंडलगा ग्राम पंचायत अध्यक्ष नागेश मननोळकर आणि दक्षिण मधून इच्छुक असलेले किरण जाधव यांना सोबत घेत नागपूर दौरा केलेला आहे.
महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेत आगामी विधानसभेत दोन्ही मराठा चेहऱ्यांना उमेदवारी देण्याची मागणी केली.मागील लोकसभा पोटनिवडणुकी दरम्यान बेळगावात झालेल्या फडणवीस यांच्या हिंडलगा येथील जाहीर सभेसाठी हिंडलगा ग्राम पंचायतीचे अध्यक्ष नागेश मननोळकर यांनी मोठी तयारी केल्याची आठवण या भेटी दरम्यान करून देण्यात आली.
ग्रामीण व दक्षिण मतदार संघात मराठा समाज मोठ्या संख्येने आहे यासाठी दोन्ही मतदार संघात दोघांना उमेदवारी मिळावी अशी मागणी यावेळी झाली.
भाजपच्या केंद्रीय संसदीय समितीत देवेंद्र फडणवीस यांचा समावेश आहे यासाठी त्यांना या तिकिटासाठी साकड घालण्यात आले आहे.