मुख्य रस्त्यावरील रहदारीस होणारा अडथळा दूर करण्यासाठी कॉलेज रोड आणि खानापूर रोड येथील सर्व दुकानं हॉटेल्स गॅरेजीस आणि इतर व्यावसायिक आस्थापनांनी आपल्या ग्राहकांसाठी पर्यायी पार्किंगची सोय करावी, अशी नोटीस रहदारी पोलीस विभागाकडून संबंधितांना बजावण्यात आली आहे.
कॉलेज रोड आणि खानापूर रोडवरील दुकान, बार, रेस्टॉरंट, गॅरेज व इतर व्यावसायिकांचे ग्राहक आपली वाहने रस्त्यावरच पार्क करत आहेत. त्यामुळे या रस्त्यावरील रहदारी सुरळीत होण्यास अडथळा निर्माण होत आहे.
तेंव्हा संबंधित दुकानदार, बार चालक, रेस्टॉरंट चालक वगैरेंनी आपल्या ग्राहकांसाठी पर्यायी पार्किंगची सोय करावी.
संबंधितांच्या ग्राहकांची वाहने जर रस्त्यावर पार्क केलेली आढळल्यास कायदेशीर कारवाई केली जाईल, असा इशारा रहदारी पोलीस विभागाकडून नोटीसीद्वारे देण्यात आला आहे.