बिम्स हॉस्पिटलच्या आवारातील तीन मजली अत्याधुनिक सुपर मल्टी -स्पेशालिटी हॉस्पिटलचे बांधकाम पूर्ण झाले असून या डिसेंबर महिन्याअखेर हॉस्पिटलचे उद्घाटन केले जाईल, असे बेळगाव उत्तरचे आमदार ॲड. अनिल बेनके यांनी जाहीर केले आहे.
बेळगाव उत्तरचे आमदार ॲड. अनिल बेनके यांनी आज बुधवारी सुपर मल्टी -स्पेशालिटी हॉस्पिटल बांधकाम विकासासंदर्भात अधिकाऱ्यांची आढावा बैठक घेऊन आवश्यक उपकरणं आणि मनुष्यबळासंदर्भात चर्चा केली. तसेच यासंदर्भात अधिकाऱ्यांनी मुख्यमंत्री आणि आरोग्यमंत्र्यांची भेट घेण्याचे ठरले. बैठकीत उद्घाटनापूर्वी हॉस्पिटल सर्वांगाने सुसज्ज असले पाहिजे अशी सक्त सूचना आमदारांनी केली.
बिम्स हॉस्पिटल बेळगावच्या आवारातील तीन मजली सुसज्ज असे अत्याधुनिक सुपर मल्टी -स्पेशालिटी हॉस्पिटलचे बांधकाम जवळपास पूर्ण झाले असून या डिसेंबर महिन्याअखेर सदर हॉस्पिटलचे उद्घाटन करण्याचा आमचा प्रयत्न राहील, असे त्यांनी सांगितले
सुपर मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटलच्या बांधकामाची पाहणी केल्यानंतर आज आयोजित हॉस्पिटलच्या विकास कामाच्या आढावा बैठकीत हॉस्पिटलचे उद्घाटन या महिन्याअखेर करण्याचा प्रयत्न असल्यामुळे प्रलंबित सर्व कामे लवकरात लवकर पूर्ण केली जावीत अशी सक्त सूचना आमदार बेनके यांनी केली. दरम्यान हॉस्पिटल मधील मनुष्यबळ आणि उपकरण कमतरते संदर्भात उद्या गुरुवारी मुख्यमंत्र्यांसह आरोग्य मंत्री आणि जिल्हा पालक मंत्र्यांची भेट घेण्याचे बैठकीत निश्चित करण्यात आले.
पत्रकारांशी बोलताना आमदार ॲड. अनिल बेनके यांनी सुपर मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटलच्या दोन मजल्यांचे काम नोव्हेंबर मध्ये पूर्ण करण्याचे ठरले होते त्यानुसार ते झाले आहे.
सर्व उपकरणं नसताना हॉस्पिटलचे उद्घाटन करणे योग्य ठरणार नाही. हॉस्पिटलसाठी कांही उपकरणे आणि मनुष्यबळाची कमतरता आहे. ही बाब मुख्यमंत्री आणि आरोग्यमंत्र्यांच्या नजरेस आणून दिली जाईल, असे स्पष्ट केले.