Wednesday, December 11, 2024

/

दगडफेकीत नव्हे तर अपघाताने फुटल्या त्या सरकारी गाडीच्या काचा

 belgaum

बेळगावात होणाऱ्या हिवाळी अधिवेशनासाठी बंगळुरु हून दाखल झालेल्या त्या वाहनावर दगडफेक झाली नसल्याचे पोलीस तपासात निष्पन्न झाले आहे.१५ डिसेंबर २०२२ रोजी, बेंगळुरू चामराजपेठ येथील कृषी ग्रामीण विकास बँकेचा बोलेरो गाडीचा चालक चेतन एन. यांनी पोलिसांत तक्रार दिली होती की कोणीतरी अज्ञातांनी त्याची बोलेरो अडविली दगडफेक करत समोरची काच फोडली त्यावेळी सदर हल्लेखोर त्याच्याशी मराठीत बोलले होते .

१४ डिसेंबर रोजी सायंकाळीच्या सुमारास बँकेच्या बोलेरो वाहन क्रमांक KA-02 MM 5173 मधून बेंगळुरूहून बेळगाव कडे येत असताना हा प्रकार घडल्याचे त्यांनी तक्रारीत म्हंटले होते.बेळगाव पोलिसांनी वरील तक्रारीच्या अनुषंगाने तपास सुरू केला पोलिसांना तपासात असे स्पष्ट झाले की तक्रारदार सकाळी 07.45 वाजता बंगलोरहून बेळगाव कडे निघाला आणि संध्याकाळी 04.30 वाजता शिग्गाव तालुक्यातील तडासा गावात जेवणासाठी थांबल होता.

हिरेबागेवाडी टोल नाक्यावरील सीसीटीव्ही फुटेजमध्ये स्टीलच्या सळ्यांनी भरलेल्या ट्रकला धडक दिल्याने त्या शासकीय बोलेरोची काच फुटल्याचे दिसून आले. सी सी टी व्ही फुटेज मध्ये दिसल्याने तक्रारदाराने सांगितल्याप्रमाणे कोणत्याही व्यक्तीने वाहनाची काच फोडली नसल्याचे निश्चित झाले आहे.Stone pelting

दरम्यान बेळगाव शहर पोलीस आयुक्तांनी आवाहन केले आहे की जनतेने कोणतीही खोटी बातमी ऐकू नये आणि खोटी तक्रार करणाऱ्या वाहन चालकावर योग्य ती कारवाई केली जाईल.पोलीस तपासात 14 रोजी सायंकाळी 7:28 वाजता हिरेबागेवाडी टोल नाक्यां वरून बेळगाव कडे येतानाचे दृश्य सी सी टी व्ही मध्ये कैद झाले आहे त्या व्हिडिओ मध्ये सदर वाहनाची काच फुटलेली स्पष्ट पणे दिसत आहे.आपला अपघात लपविण्यासाठी मराठी भाषिकांवर दगडफेक केल्याचा खोटा आरोप करणाऱ्या चालकावर कायदेशीर कारवाई केली जाणार आहे. Cctv toll naka

कायदा आणि सुव्यवस्था विभागाचे डी सी पी रवींद्र गडादी यांनी सदर हिरेबागेवाडी टोल नाक्यांवरचा सी सी टी वी फुटेज माध्यमांना दिले आहे.अधिवेशनाच्या पूर्वी आणि दिल्लीत केंद्रीय गृहमंत्री आणि कर्नाटक महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांच्या बैठकीच्या पाश्र्वभूीवर वातावरण तापले असताना अधिवेशनासाठी आलेल्या वाहनावर अज्ञातांकडून दगडफेक अशी फिर्याद त्या चालकाने दिली होती त्यानुसार सगळीकडे बातम्या देखील प्रसारित झाल्या होत्या.

अनेकांनी तर सदर दगडफेक मराठी भाषिकांनी केल्याचा संशय व्यक्त केला होता मात्र पोलिसांनी टोल नाक्यावरील सदर गाडीचा व्हिडिओ प्रसिद्ध केल्याने दगडफेक नव्हे तर अपघातात हिरेबागेवाडीत दाखल होण्यापूर्वी गाडीची काच फुटली असल्याचे स्पष्ट झाले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.