सर्वोच्य न्यायालयात अंतिम टप्प्यावर असणाऱ्या सुनावणीदरम्यान, महाराष्ट्र आणि कर्नाटक सीमावादावर तात्पुरता पडदा टाकण्यासाठी केंद्रीय गृहमंत्र्यांच्या उपस्थितीत दोन्ही राज्यांच्या मुख्यमंत्र्यांची बैठक दिल्ली येथे बुधवारी पार पडली.
यानंतर लगेचच महाराष्ट्राचे मंत्री शंभूराज देसाई हे बेळगावच्या सीमेला लागूनच असलेल्या चंदगड तालुक्यातील शिनोळी या गावात जाऊन मराठी भाषिकांना आधार देण्यासाठी उपस्थित राहणार आहेत, अशी माहिती उपलब्ध झाली आहे.
सीमाप्रश्नावरून दोन्ही राज्यांमध्ये सुरु असलेला वाद निवळण्यासाठी केंद्रीय गृहमंत्र्यांनी घेतलेल्या बैठकीची चर्चा अद्याप ताजी अजूनही काही तासातच शंभूराज देसाई यांच्या या घोषणेमुळे सीमावासीयांमध्ये नवी ऊर्जा निर्माण झाली आहे
बेळगावपासून काही किलोमीटर अंतरावर असणाऱ्या या गावात शंभूराज देसाई उपस्थित राहणार असल्याने कर्नाटकाकडूनही यावर प्रतिक्रिया दिली जाणार हे नक्की आहे.
बेळगावमध्ये महाराष्ट्रातील मंत्र्यांना घालण्यात आलेला निर्बंध लक्षात घेत बेळगावमध्ये न येता शिनोळी येथे ते हजर राहणार आहेत. शिनोळी येथे शंभूराज देसाई यांची सभा होणार आहे. या सर्व घडामोडी सुरु असताना सीमाभाग संवेदनशील झाला असून या पार्श्वभूमीवर शंभूराज देसाई यांचा दौरा महत्वपूर्ण ठरणार आहे.