‘छत्रपती शिवाजी महाराजांना समजावून घ्यायचे असेल तर त्यांनी लढविलेले किल्ले आणि गड यांची प्रत्यक्षात पाहणी करण्याची गरज आहे. मच्छे गावचे तरुण सार्वजनिक बाल शिवाजी वाचनालय चालवीत असतानाच हे गड भ्रमंतीचेही कार्य करीत आहेत हे कौतुकास्पद काम आहे” असे विचार इतिहासाचे अभ्यासक नितीन कपिलेश्वरकर यांनी बोलताना मांडले .
मच्छे येथील सार्वजनिक श्री बाल शिवाजी वाचनालय च्या स्थापनेला 49 वर्षे पूर्ण झाली असून वाचनालयाने पन्नासाव्या वर्षात पदार्पण केले आहे. ग्रामीण भागात एवढे दीर्घकाळ चालणारे कदाचित हे एकमेव वाचनालय असेल .या वाचनालयाचा 49 वा वर्धापन दिन रोजी साजरा करण्यात आला.
रविवारी सायंकाळी सहा वाजता वाचनालयाच्या समोरील प्रांगणात आयोजित करण्यात आलेल्या या कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून उद्योजक सचिन
कल्लीमनी ,मकरंद बापट व वाचनालयाचे संस्थापक अनंत लाड तर अध्यक्षस्थानी वाचनालयाचे नवनिर्वाचित अध्यक्ष श्री गजानन छप्रे हे उपस्थित होते. प्रमुख वक्ते म्हणून इतिहासाचे अभ्यासक नितीन कपिलेश्वरकर हे उपस्थित होते.
कार्यक्रमाची सुरवात क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेचे पूजन व दीप प्रज्वलन करून करण्यात आली. यावेळी मेघा धामणेकर या विधार्थीनीने भगवतगीता अध्याय पठण केले.
प्रारंभी पाहून्यांचा परिचय वाचनालयाचे संस्थापक श्री अनंत लाड सरांनी करून पाहून्यांचे स्वागत केले. त्या नंतर वाचनालयाचा जीर्णोद्धार करण्यासाठी देणगी दिलेल्या व श्रमदान केलेल्या दानशूर व्यक्तींचा पाहुण्यांचे हस्ते शामची आई पुस्तक व रोपटे देऊन सर्वांचा सत्कार करण्यात आला.
देणगीदार -शांताराम पाटील, आनंद बेळगावकर,लवकुमार मोटरे, सूर्यकांत मरूचे, भुजंग भातकांडे,संभाजी कणबरकर, गजानन धामणेकर,गजानन लाड, अनंत कणबरकर, सुशील धामणेकर, विनायक भोसले, सागर जैनोजी, श्रीरंग चौगुले, अमोल पवार, घनश्याम पाटील,महेश काकतीकर,व नूतनीकरणातून अप्रतिम अशी वास्तू साकारल्याबद्दल सर्वांचं विशेष कौतुक करण्यात आले. मच्छे सारख्या गावात गेल्या गेल्या पन्नास वर्षापासून हे वाचनालय चालू असल्याबद्दल श्री बापट आणि श्री कल्लीमणी यांनी समाधान व्यक्त केले.
सूत्र संचलन विनायक चौगुले यांनी केले. संतोष जैनोजी यांनी सर्वांचे आभार मानले.या कार्यक्रमाला असंख्य वाचक, महिला, विध्यार्थी, विधार्थिनी व गावकरी उपस्थित होते.