बेळगाव लाईव्ह : बेळगावमध्ये सुरु असलेल्या हिवाळी अधिवेशनाचा आज तिसरा दिवस असून अधिवेशनात दुपारच्या सत्रा पर्यंत खानापूरच्या आमदार अंजली निंबाळकर आणि कायदा मंत्री मधू स्वामी यांच्यातील खंडाजगी चर्चेचा विषय ठरली होती.
भाजपचे आमदार सिधू सवदी यांनी ग्रामीण भागात अपुऱ्या बस सेवेचा मुद्दा उपस्थित केल्या नंतर त्या मुद्द्यावरून काँग्रेसचे सर्व आमदारानी उचलून धरत सदर समस्या सर्वच मतदार संघात असल्याचा आरोप केला त्यावर राज्याचे परिवहन मंत्री श्रीरामलु यांनी हा प्रश्न आमच्या पक्षाच्या आमदाराने उपस्थित केला असल्याचे सांगताच काँग्रेसच्या आमदारांनी जोरदार घोषणाबाजी करत सभापतींच्या आसनासमोर उतरल्याने गोंधळ केला.यानंतर प्रभारी सभापती कुमार बंगरप्पा यांनी सभगृहाचे कामकाज दहा मिनिटासाठी तहकूब केले.
सभागृहाचे कामकाज पुन्हा सुरू झाल्यानंतर विरोधी पक्षनेते सिद्धरामय्या यांनी सरकारकडून माफीची मागणी केली तसेच ग्रामीण बसतेच्या मुद्द्यावर अर्धा तास चर्चा करा अशी मागणी केली परंतु त्यावेळी खानापूरचे आमदार अंजली निंबाळकर यांनी सभापतीच्या आसनासमोर आंदोलन करत असते वेळी कायदामंत्री मधू स्वामी यांना उद्देशून बोलण्यास सुरू करतात मधु स्वामी यांनी सभापतींना तत्काळ त्यांच्यावर कारवाई करण्याची मागणी केली निंबाळकर यांना तुम्ही मला उद्देशून बोलू शकत नाही असे ठणकावून सांगितले.
भाजपच्या सत्ताधारी पक्षातील सर्व आमदारांकडून आम्ही एक प्रस्ताव मानतो की तुम्हाला तात्काळ निलंबित करण्यात यावे अशी मागणी करत त्यांनी अशी मागणी करत त्यांनी सभापती कुमार बंगाराप्पा तत्काळ निलंबनाची मागणी केली. यावेळी सभागृहात काही वेळ गोंधळ निर्माण झाला.
भोजन अवकाश नंतर मुख्यमंत्री बोममाई यांनी कामकाज चालू असताना आमदार मंत्र्यांनी सभागृहाचे भान राखून वर्तन करावे सभागृह सुरळीत चालवण्यासाठी सहकार्य करण्याचे आवाहन केले.