Saturday, November 16, 2024

/

सीमा भागातील मराठीला दिलासा…

 belgaum

गेली 66 वर्ष दुःखाचं गांभ घेऊन हिंडणाऱ्या मराठी जनतेला कुठेतरी सुखाची झालर लावल्याच समाधान केंद्रीय गृह मंत्र्यांच्या बुधवारी दिल्लीत झालेल्या बैठकीने वाटले असेल.पावसाने झोडले अन राजाने मारलं तर विचारायचं कुणाला अशी परिस्थिती सीमा भागातील मराठी जनतेची होती.न्याय मागण्या असताना सुद्धा मराठी जनतेला सत्ताधाऱ्यांच्या कडून कोणताही न्याय मिळत नव्हता कारण भैस भी उनकी लाठी भी उनकी अशी परिस्थिती होती आपल्या जगण्याचा परीघ केंद्रित करून मराठी जनतेला सीमावर्ती भागात जीवन जगावं लागत होते. मानवतावादी कोणतेही हक्क मराठी जनतेला मिळत नव्हते त्याच पाश्र्वभूमीवर आत्ता कायदा आणि सुव्यवस्थे वर सिनियर आय पी एस दर्जाचा अधिकारी लक्ष ठेऊन असणार आहे ही बाब मराठी जनतेला दिलासादायक ठरणार आहे.

कुणाच्याही येण्या जाण्यावर निर्बंध असणार नाहीत त्याच बरोबर स्वतःच्या आस्मिते वरही कार्यक्रम घेता येणार आहेत पण आरोप करता येणार नाहीत त्याच बरोबर कर्नाटक महाराष्ट्रातील तीन तीन मंत्री घेऊन एक समिती गठीत केली जाणार आहे जी शेवटच्या घटकापर्यंत काम करेल.या समितीच्या घटनांमुळे एकंदर सीमाभागातील जनतेवर होणाऱ्या आत्त्याचारावर चाप बसेल त्याच बरोबर या समितीची इच्छाशक्ती जर प्रामाणिकपणे व मूल्याधिष्ठित काम केली तर सीमा भागात सौहार्दतेचे वातावरण निर्मिती करण्यात ते यशस्वी ठरतील

केंद्रीय गृह मंत्री अमित शहा यांनी त्या पद्धतीची खेळी करून कर्नाटकच्या वर्तणुकीला आणि महाराष्ट्राच्या अधिकाराला छेद देण्याचा प्रयत्न केला आहे.
वातावरण दूषित करणाऱ्या लोकांच्या वर कडक कारवाईचा इशारा दिल्यामुळे अनेकांची दुकाने बंद होणार आहेत हे मात्र खरे आहे.Home minister meeting

सीमाभागातील मराठी कागदपत्रांचा मुद्दा,साहित्य संमेलनात साहित्यिकांची असणारी उपस्थिती,मराठी शाळांचा प्रश्न काही प्रमाणात कर्नाटकी निर्बंधाच्या बाहेर येतील काही केवळ आंदोलनावर पोहोचलेल्या संघटनावर कठोर कारवाई करणार असल्याचे सूचित केल्यामुळे खोट्या आस्मितेवर जगणाऱ्या स्वयंघोषित नेत्यांची गोची होणार हे निश्चित आहे.

केंद्रीय गृह मंत्री अमित शहा यांनी सीमाभागाचा मुद्दा हा सुप्रीम कोर्टात प्रलंबित असल्याने त्याचा निकाल लागे पर्यंत कोणतेही दावे करू नयेत असे स्पष्ट सांगितल्याने वाचाळ वीरांना मुसक्या घातल्या सारखे होईल. महाराष्ट्र एकीकरण समितला आता मराठी साठी रचनात्मक काम करण्याची संधी आलेली आहे.मराठीचा विकास वृध्दी आणि मराठीला बलशाली बनवण्यासाठी त्यांनी काम करावे लागेल.

 belgaum

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.