Monday, March 10, 2025

/

माजी विद्यार्थ्यांकडून शाळेला लाखांची मदत

 belgaum

माझ्या गावी माझी शाळा, ‘मला तिचा अजून लळा’ जर माणूस कितीही मोठा झाला तरी बालपणी बाळकडू घेतलेल्या शाळेला तो कधीच विसरत नसतो.

समाजात अनेक ठिकाणी माजी विद्यार्थी लहानपणी आपण शिकलेल्या शाळेला मोठी मदत देत असतात हे आपण पाहिलं आहे याचीच कास धरत बेळगाव तालुक्यातील कंग्राळी बुद्रुक गावातील प्राथमिक मराठी शाळेच्या माजी विद्यार्थ्यांनी आपल्या शाळेला जवळपास सव्वा लाखाहून अधिक रुपयांची आर्थिक मदत देऊ केली आहे.

रविवारी कंग्राळी बुद्रुक गावातील सरकारी उच्च प्राथमिक मराठी शाळेच्या नूतन इमारतीच्या स्लॅब भरणीचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. यानिमित्ताने १९९६/९७ साली उत्तीर्ण झालेल्या मराठी शाळेच्या माजी विद्यार्थ्यानी मराठी शाळेच्या विकासासाठी १,२७,०००/- रुपयांची देणगी दिली.

या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी दत्ता पाटील तर उपाध्यक्ष पदी पूनम पाटील होते कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शंकर कोणेरी यांनी केले.Marathi school

माजी विद्यार्थी संघाच्या वतीने १९९६-९७ सालच्या माजी विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला. ९६-९७ सालच्या माजी विद्यार्थ्यांच्या वतीने मारुती रामचंद्र पाटील आणि विनायक निंगाप्पा पाटील हे व्यासपीठावर होते. यावेळी माजी विद्यार्थिनी विना नांगरे हिचा सत्कार करण्यात आला. ९६-९७ बॅचच्या वतीने शाळेच्या विकासासाठी एक कर्तव्य समजून मदत करण्याचं आवाहन माजी विद्यार्थी विनायक कृष्णा पाटील यांनी केले आणि तसेच शाळेच्या शिक्षणाचा दर्जा वाढायला हवा अशी इच्छा त्यांनी व्यक्त केली.

आपल्या शाळेत देणाऱ्या शिक्षणात बदल घडवण्याची इच्छा गजानन पाटील यांनी गावातील बहुतेक लोकानी आपल्या मुलांना मराठी शाळेत पाठवावी यासाठी व्यक्त केली ग्राम पंचायत उपाध्यक्ष यल्लोजी पाटील यांनी माजी विद्यार्थ्यांचे आभार व्यक्त केले. ९६-९७ सालच्या माजी विद्यार्थ्यांकडून देणगी जमा करण्यासाठी मारुती पाटील, रामा निलजकर, सुनील पाटील, संभाजी मासेकर, व इतरांची मदत लाभली.

 belgaum

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.