महाराष्ट्र एकीकरण समितीच्या वक्सिन डेपो वर जो महामेळावा होणार होता त्याला गैर मार्गाने विरोध करून पोलिसांनी दडपशाही चालू केली आहे.
144 कलमाचे निमित्त पुढे करून मेळाव्याला परवानगी नाकारली आणि सकाळी मेळाव्याच्या ठिकाणी येणाऱ्या नेते कार्यकर्त्यांचे अटकसत्र चालू केलं आहे.मोठ्या प्रमाणात पोलिसांचा फौजफाटा उभा करून दशहतीचे वातावरण निर्माण केले आहे.
महिला कार्यकर्त्यांसह मोठ्या प्रमाणात कार्यकर्त्याची धरपकड सुरू असल्याने त्या घटनेचा निषेध म्हणून माजी आमदार समितीचे कार्याध्यक्ष मनोहर किनेकर यांनी अन्न त्याग आंदोलन सुरू केले आहे.
कॅम्प महिला पोलीस स्थानकात माजी महापौर सरिता पाटील माजी उपमहापौर रेणू किल्लेकर ,शिवानी पाटील यांच्यासह महिला कार्यकर्त्यांना स्थानबद्ध करण्यात आले आहे या शिवाय माजी आमदार किनेकर यांच्यासह कार्यकर्त्यांना ए पी एम सी पोलीस स्थानकात ठेवण्यात आले आहे परंतु जागोजागी कार्यकर्ते या अटकेचा निषेध म्हणून आंदोलन करत आहेत.
भवानी नगर येथे तालुका समितीच्या शेकडो कार्यकर्त्यांनी तर कंग्राळी खुर्द येथे सरस्वती पाटील यांनी तर मराठा कॉलनीत खानापूर समितीच्या कार्यकर्त्यांनी आंदोलन केले.
दरम्यान माजी आमदार मनोहर किनेकर माजी केंद्रीय मंत्री शरद पवार यांना संदेश देत घटनेची माहिती दिली आहे.नागपूरला महाराष्ट्र विधी मंडळाचे अधिवेशन सुरू आहे त्यातही या घटनेचे पडसाद उमटू लागले आहेत.