डबल मर्डरने हादरले शिंदोळी

0
4
Shindoli murder
 belgaum

बेळगावजवळील शिंदोळी गावात दोन तरुणांची धारदार शस्त्राने हल्ला करून खून केल्याची घटना रविवारी रात्री घडली आहे.

रविवारी रात्री अकराच्या सुमारास मारीहाळ पोलीस मुख्यमंत्री बसवराज बोम्माई यांच्या विमानतळावर आगमनाच्या बंदोबस्तात व्यस्त असताना सांबऱ्या जवळील शिंदोळी येथे डबल मर्डरची घटना घडल्याने खळबळ माजली होती. रात्री अकराच्या सुमारास मारिहाळ पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन तपास चालू केला.

शिंदोळी येथे धारधार शस्त्रांनी केलेल्या हल्ल्यात बसवराज बेळगावकर वय 24 तर गिरीश नगुनावर वय 24 दोघेही राहणार शिंदोळी यांचा मृत्यू झाला आहे.गेल्या महिन्यात सांबऱ्या जवळील सुळेभावी येथेही डबल मर्डरची घटना ताजी असताना शिंदोळी येथेही दुहेरी हत्याकांड घडले आहे त्यामुळे बेळगावचा पूर्व भागात गुन्ह्यांचे प्रमाण वाढले आहे.

 belgaum

Shindoli murder
वाहन व्यवसाय व वैयक्तिक वैमनस्य हे खुनाचे कारण असल्याची शक्यता व्यक्त होत असून शिंदोळी गावात क्रिकेट स्पर्धा सुरू आहे रविवारीच्या स्पर्धेनंतर लोक घरी परतत असताना ही घटना घडल्याचे सांगण्यात येत आहे.मारीहाळ पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन तपास सुरू केला आहे.

रविवारी रात्रभर जिल्हा रूग्णालयात मोठा पोलिस बंदोबस्त ठेवण्यात आला असून शिंदोळी येथेही पोलिस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेऊन तपास सुरू केला आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.