राज्यातील पाचवी आणि आठवीच्या विद्यार्थ्यांसाठी पुरवणी परीक्षा घेण्याचा दोन दिवसांपूर्वी घेतलेला निर्णय शिक्षण खात्याने रद्द केला असून तसे परिपत्रकही जारी केले आहे.
पाचवी आणि आठवीसाठी बोर्ड परीक्षेच्या धरतीवर वार्षिक परीक्षा घेण्याचा निर्णय शिक्षण खात्याने घेतला आहे त्या अनुषंगाने गेल्या 13 डिसेंबर रोजी एक परिपत्रक जारी करण्यात आले आहे त्यात पाचवी व आठवीच्या वार्षिक परीक्षेत अनुत्तीर्ण होणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी पुरवणी परीक्षा घेण्याचे नमूद करण्यात आले होते पुरवणी परीक्षेत विद्यार्थी उत्तीर्ण झाल्यावरच त्याला पुढील वर्गात दाखल करण्याची तरतूद ही या परिपत्रकात होती पण शिक्षण खात्याच्या निर्णयाला राज्यभरातून विरोध झाला परिणामी दोनच दिवसात शिक्षण खात्याने हा निर्णय मागे घेतला आहे पुरवणी परीक्षेचा निर्णय मागे घेतल्याचे परिपत्रक शिक्षण खात्याकडून गेल्या बुधवारी जारी करण्यात आले आहे.
राज्यातील दहावी व बारावीच्या बोर्ड परीक्षेत अनुत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांसाठी पुरवणी परीक्षा घेतली जाते अनुत्तीर्ण विद्यार्थ्यांचे वर्ष वाया जाऊ नये यासाठी कर्नाटक शिक्षण खात्याकडून गेल्या अनेक वर्षांपासून ही पुरवणी परीक्षा घेतली जाते आता पाचवी व आठवीसाठी बोर्डाच्या धरतीवर परीक्षा घेतली जाणारा असल्याने त्या विद्यार्थ्यांसाठी देखील पुरवणी परीक्षा घेण्याचा निर्णय झाला होता मात्र तो निर्णय रद्द करण्याची वेळ शिक्षण खात्यावर आली आहे.