पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शहा यांच्या नावे निवेदन देण्यासाठी गेलेल्या महाराष्ट्र एकीकरण समितीच्या नेत्यांवर केलेल्या दडपशाहीविरोधात गावागावांतून निषेध करण्यात येत आहे.
मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांच्या आदेशानुसार महाराष्ट्रातील मंत्र्यांवर जिल्हा बंदीची कारवाई करण्यात आली आहे. पण, आज कन्नड संघटनेच्या गुंडांनी महाराष्ट्राच्या वाहनांवर दगडफेक केली.
त्यामुळे मंत्र्यांना जिल्हाबंदी आणि मराठी भाषिकांवर होणार्या अन्यायाची दखल घ्यावी, घटनात्मक हक्कांच्या पायमल्लीची पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी दखल घ्यावी, अशा मागणीचे निवेदन जिल्हाधिकार्यांना देण्यासाठी म. ए. समिती नेते जिल्हाधिकारी कार्यालयाकडे गेले होते. त्यावेळी पोलिसांनी दडपशाही करून त्यांना अटक केली. सरकारच्या या कारवाईविरोधात येळ्ळूर विभाग, उचगाव विभाग, शहापूर विभाग म. ए. समितीसह कंग्राळी खुर्द, मंडोळी, हंगरगा, सावगाव, बेनकनहळ्ळी, आंबेवाडी, मण्णूर, बेळगुंदी आदी गावांतून कर्नाटक सरकारचा निषेध करण्यात आला.
कंग्राळी खुर्द मध्ये असा निषेध
कंग्राळी खुर्द येथे कर्नाटक शासनाच्या दडपशाहीचा तीव्र निषेध-महापरिनिर्वाण दिना-दिवशीच बाबासाहेबांनी लिहिलेल्या संविधानाचा अपमान*
कंग्राळी खुर्द – संविधानिक मार्गाने महाराष्ट्र एकीकरण समितीचे नेते आज बेळगाव येथे जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देण्यासाठी गेले असता कर्नाटक सरकारने दडपशाही करून संविधानाने दिलेल्या अधिकाराची पायमल्ली करत आज महाराष्ट्र एकीकरण समितीच्या चाळीसहून अधिक नेत्यांना अटक केली. याचा आम्ही *महाराष्ट्र एकीकरण समिती कंग्राळी खुर्द* यांच्यावतीने जाहीर निषेध करण्यात आला.
बाबासाहेबांनी देशातील प्रत्येक नागरीकाला काही हक्क तसेच कर्तव्य यांचे लिखीत स्वरूपात संविधान तयार केले आहे त्यानुसार आज म . ए समितीचे नेते अगदी शांततेच्या मार्गाने पंतप्रधान मोदीजी व गृहमंत्री अमित शहा यांना मराठी माणसाच्या वेदनाचे निवेदन जिल्हाधिकाऱ्याना देण्यासाठी गेले होते पण त्याना विनाकरण अटक करून बाबा साहेबांच्या महपरीनिर्वाण दिनीच त्यांनी लिहलेल्या संविधानाचा अपमान केला . खरोखरच देशाचा संविधानाचा हा अपमान असून या दडपशाही तीव्र निषेध करण्यात आला तसेच असे कृत्य करणाऱ्या प्रशासनाला ईश्वर सद्बुद्धी देवो अशी प्रार्थना ही केली यावेळी कंग्राळी खुर्द म . ए शाखेच्या वतिने करण्यात आली . यावेळी मा ग्रा.प अध्यक्ष भाऊ पाटील , ग्रा.प सदस्य प्रशांत पाटील , शेतकरी संघटनेचे नारायण पाटील , प्रल्हाद पाटील , बाबू पावशे , जोतीबा पाटील , विनय पाटील , विशाल पाटील , मंजूनाथ पाटील यांचेसह म . ए . समिती कार्यकर्ते उपस्थित होते .
.
*कर्नाटक सरकारच्या दडपशाहीचा येळ्ळूर विभाग म.ए. समिच्या वतिने जाहीर निषेध*
महाराष्ट्र कर्नाटक सीमेवर महाराष्ट्रातील बसेसवर कर्नाटकातील गुंडानी दगडफेक केली व प्रवाशांना दुखापत झाली, हे त्वरित थांबले पाहिजे अन्यथा येळ्ळूरची जनता स्वस्त बसणार नाही, असा इशारा येळ्ळूर विभाग महाराष्ट्र एकीकरण समिती सरकारला देत आहे.
येळ्ळूर विभाग महाराष्ट्र एकीकरण समितीचे अध्यक्ष शांताराम कुगजी सेक्रेटरी प्रकाश अष्टेकर दुदाप्पा बागेवाडी राजु पावले ग्राम पंचायत अध्यक्ष सतिश पाटील सदस्य रमेश मेणसे शिवाजी नांदुरकर राकेश परिट परशराम परिट दयानंद उघाडे जोतिबा चौगुले प्रमोद पाटील वाय.सी.ईगळे विलास घाडी शिवाजी कदम मधू पाटील विलास घाडी दत्ता उघाडे परशराम घाडी प्रकाश मालुचे गीपाळ कुगजी व इतर कार्यकर्ते उपस्थित होते.