केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या बेळगावातील रॅलीमध्ये नियमांचे उल्लंघन केल्याप्रकरणी पोलिसांनी दाखल केलेल्या खटल्यातून आमदार ॲड. अनिल बेनके आणि शशिकांत पाटील यांची बेंगलोर येथील लोकप्रतिनिधी विशेष न्यायालयाने निर्दोष मुक्तता केली आहे.
बेळगाव उत्तरचे आमदार ॲड. अनिल बेनके यांच्यासह तत्कालीन सरचिटणीस शशिकांत पाटील यांच्यावर खडेबाजार येथे केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या रॅलीमध्ये नियमांचे उल्लंघन केल्याप्रकरणी मार्केट पोलीस स्टेशनमध्ये लोकप्रतिनिधी कायद्याच्या कलम 127 (अ) आणि केपीडीपी कायद्याच्या कलम 3 आणि 4 अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला होता.
बेंगलोर येथील लोकप्रतिनिधी विशेष न्यायालयात काल शुक्रवारी या खटल्याची सुनावणी झाली. या सुनावणीप्रसंगी एकूण 18 साक्षीदार हजर झाल्यानंतर विशेष न्यायालयाने आमदार ॲड. बेनके व पाटील यांची निर्दोष मुक्तता केल्याचा निकाल जाहीर केला.
भारतीय जनता पक्षाच्या विधी समितीचे सदस्य, राज्य समितीचे सदस्य आणि ॲड. देवराज बस्तवाड यांनी या खटल्यात युक्तिवाद केला. याप्रसंगी बेळगाव महानगरचे विधी समितीचे सहसंचालक संदीप एस. उपस्थित होते.