Friday, December 27, 2024

/

आस अन ध्यास केवळ सीमाप्रश्नाच्या सोडवणुकीचा

 belgaum

बेळगाव लाईव्ह : गेली ६७ वर्षे महाराष्ट्रात जाण्याच्या तळमळीने कर्नाटकी अत्याचाराशी झुंझ देणाऱ्या मराठी भाषिकाने आपला कणा आणि बाणा आजवर ताठ ठेवला आहे याचा प्रत्यय अनेकवेळा, अनेक आंदोलनांमधून आला आहे.

सीमालढ्यात आता चौथी पिढी उतरली असून आजच्या घडीला गेल्या ६७ वर्षांपासून झुंझ देणाऱ्या सीमा आंदोलकांमध्ये आजही तशीच उर्मी आणि तीच रग आहे. या गोष्टीचा अनुभव आज कोल्हापूर आंदोलनामधून पुन्हा एकदा पाहायला मिळाला.

सीमाभागातील पवार गल्ली येथील बाळकृष्ण जगन्नाथ काजोळकर या ६५ वर्षीय कार्यकर्त्याने चक्क बेळगाव ते कोल्हापूर हा प्रवास सायकलवरून केला. म. ए. समितीने पुकारलेल्या ‘चलो कोल्हापूर’ आंदोलनात सहभागी होण्यासाठी बाळकृष्ण काजोळकरांनी सायकलप्रवास करत महाराष्ट्रात जाण्याची तीव्र इच्छा प्रकट केली.Ride bycycle up kop

धरणे आंदोलनात सहभागी होऊन घोषणाही दिल्या आणि महाराष्ट्रात जाण्याची तीव्र तळमळदेखील व्यक्त केली.वयोमानानुसार त्यांनी केलेल्या सायकलवारीचे कौतुक तर आहेच परंतु केवळ आणि केवळ सीमाप्रश्न सुटावा म्हणून ज्या तळमळीने त्यांनी हा प्रवास केला यावरून कर्नाटकात मराठी माणसाची होत असलेली घुसमट लक्षात येते.

बेळगाव सीमा प्रश्न सोमवारी कोल्हापूर मुक्कामी झालेल्या धरणे आंदोलनात सहभागी होण्यासाठी पवार गल्ली शहापूर येथील 65 वर्षीय बाळू जगन्नाथ काजोळकर हे सायकल चालवत कोल्हापूरला आंदोलनात सहभागी होण्यासाठी गेले होते.

चलो कोल्हापूर रॅलीमध्ये सहभाग दर्शवण्यासाठी बेळगाव कोल्हापूर ते नॉन स्टॉप सायकल चालवली आणि पुन्हा एकदा महाराष्ट्रात सामील होण्याच्या आपल्या भावना व्यक्त केल्या आजच्या तिसऱ्या पिढीसमोर या 65 वर्षीय बाळू अण्णांनी सायकल चालवत लढ्याला बळकटी देण्यासाठी आंदोलनात सहभागी झाल्यामुळे अनेकांच्या भुवया उंचावल्या होत्या.

बेळगाव दक्षिण मतदार संघातील महाराष्ट्र एकीकरण समितीचे एकमेव नगरसेवक असलेले रवी साळुंखे यांनी आपल्या वार्डातील या कट्टर समितीच्या कार्यकर्त्याचा सत्कार केला. सोमवारी रात्री कोल्हापूरहून वापस बेळगाव ला आल्यावर पवार गल्ली शहापूर येथे नगरसेवक रवी साळुंखे यांच्यासह विक्रम पोटे प्रसाद पोटे विकास लगाडे रोहन कराडकर विकास भेकने शुभम भेकणे संजय पाटील आदी मोठ्या संख्येने कार्यकर्ते उपस्थित होते. 65 व्या वर्षी सायकल वरून जात कोल्हापुरात आंदोलनात सहभागी होत बाळू मामा यांनी आजच्या तिसऱ्या पिढीतील युवा कार्यकर्त्यांसमोर नक्कीच एक आदेश ठेवलाय असे मत नगरसेवक साळुंखे यांनी यावेळी व्यक्त केले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.