Wednesday, January 15, 2025

/

चंगळवादी संस्कृती विरोधात साहित्यिकांनी पुढे यावे – डॉ यशवंत पाटणे

 belgaum

माणसाला मातृभाषा आणि संस्कृती या दोन गोष्टी वारसा हक्काने मिळतात मातृभाषा ही शिक्षण ज्ञान आणि संस्कृती यांच्या विकासासाठी प्रेरक असते जे ज्ञान मातृभाषेतून मिळते त्याला संस्कृतीचा सुगंध असतो आपली संस्कृती अंधारातून प्रकाश कडे जाण्याचा संदेश देते सध्या लोकशाही मुल्ले पायदळी तुडवली जात असल्याने अंधार नाटक चालला आहे समाजाच्या विविध घटकांमध्ये प्रेम सामंजस्य आणि विश्वास निर्माण करण्याची गरज आहे त्यासाठी साहित्यिकांनी पुढे आले पाहिजे.असे मत प्राचार्य यशवंत पाटणे यांनी मांडले

बेळगाव येथील बेळगुंदी मधील श्री रवळनाथ पंचक्रोशी साहित्य अकादमी बेळगुंदी यांच्या वतीने आयोजित 17व्या मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष म्हणून बोलत होते.यंदाच्या साहित्य संमेलनाची सुरुवात पश्चिम भागातील बेळगुंदी इथल्या साहित्य संमेलनाने झाली आहे.

यावेळी बोलताना डॉ पाटणे पुढे म्हणाले धर्म द्वेष भाषादिवस अतिरेकी चंगळवादामुळे संस्कृतीची हानी होत चालली आहे सामान्य माणूस एका गुंगीत जगतो आहे त्याला जागे करून सस्त परिस्थितीची जाणीव करून दिली पाहिजे निर्भय सत्यशोधकाची भूमिका साहित्यिकांनी घेतली पाहिजे उत्कृष्ट साहित्य निर्मिती ही समाजाची उत्कट प्रतिक्रिया असते काळजातील कळ जेव्हा कागदावर उमटते तेव्हा साहित्याची निर्मिती होते ते समाजाच्या स्थिती गतीचे चित्रण करते श्रेष्ठ साहित्याला देशाची भाषेची काळाची बंधने नसतात चंगळवादी संस्कृतीमुळे नव्या जगातला माणूस कमालीचा आत्मकेंद्री झाला आहे बेकार तरुणाईचा श्रम करी शेतकऱ्यांचा कामगाराचा आक्रोश वाढत असताना साहित्याने अवतीभवतीच्या प्रश्नाविषयी ठोस भूमिका घेऊन समाज मनात मानवतेचे बीज रुजवले पाहिजे.

बेळगुंदी साहित्य संमेलनात असे झाले ठराव
सीमा प्रश्न न्यायप्रविष्ठ असल्यामुळे केंद्र शासनाने सीमा भाग केंद्रशासित करावा अन्यथा सीमा भागातील मराठी जनतेला कार्यालयीन कामकाजासाठी लागणाऱ्या कागदपत्रांची मराठी भाषेत पूर्तता करण्यास कर्नाटक शासनाला सूचित करून सीमा भागातील जनतेला न्याय मिळवून द्यावा.

सीमाभागात होणारी साहित्य संमेलन ही मराठमोळ्या संस्कृतीचे अविभाज्य अंग आहेत सहा दशकाचा लोक लढा आपणास ज्ञात आहे. तेव्हा न्यायालयीन लढ्याला लोकलढ्याचे पाठबळ आहेच त्याचेच एक मूलभूत म्हणून लोक लढा लोकवर्गणीतून संपन्न होत असलेल्या साहित्य संमेलनाला महाराष्ट्र शासनाने दरवर्षी दोन महिने अगोदर शासकीय अनुदान कमीत कमी पाच लाख रुपये संस्थांच्या बचत खात्यात बिनशर्थ जमा करावेत. ते सीमा वासियांना आर्थिक आणि सामाजिक न्याय द्यावा ही विनंती.Belgundi sahitya sammelN

चार सत्रात झाले संमेलन

बेळगुंदी येथील हे 17 वे मराठी साहित्य संमेलन एकूण चार सत्रांमध्ये पार पडले. सकाळच्या पहिल्या सत्रात ग्रंथदिंडी, संमेलनाचे उद्घाटन झाले संमेलनाचे उद्घाटन माजी जि. पं. सदस्य मोहनराव मोरे यांनी केले तर स्वागताध्यक्ष रामचंद्र गणपती पाटील होते

संमेलनाच्या दुसऱ्या सत्रात ‘साहित्य आणि वर्तमान काळ’ या विषयावर परिसंवादाचा कार्यक्रम झाला. प्रा. वैजनाथ महाजन यांच्या अध्यक्षतेखाली परिसंवादामध्ये प्रा. दि. बा. पाटील (सांगली) डॉ. दीपक स्वामी (इस्लामपूर) आणि प्रा. भिमराव धुळूबुळू (मिरज) यांचा सहभाग असणार आहे.

तिसऱ्या सत्रात डॉ. अनिता खेबुडकर (मिरज) यांच्या अध्यक्षतेखाली कवी संमेलन झाले या संमेलनात निवडक कवींकडून निवडक कवितांचे वाचन झाले चौथ्या शेवटच्या सत्रात ‘कुटुंब रंगलाय काव्यात’ हा कार्यक्रम झाला विसुभाऊ बापट (मुंबई) हे या कार्यक्रमाचे सादरकर्ते होते.

 belgaum

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.