Friday, January 17, 2025

/

24 तास पाण्यासाठी 9 जलकुंभांची उभारणी

 belgaum

बेळगाव शहराला 24 तास पाणीपुरवठा करण्यासाठी शहराच्या विविध भागात 9 ठिकाणी जलकुंभ उभारले जात असून जुलै 2023 पर्यंत हे काम पूर्ण होणार आहे. एल अँड टी कंपनीकडे शहर पाणीपुरवठ्याची जबाबदारी असून येत्या जून 2023 पर्यंत संपूर्ण शहराला 24 तास पाणीपुरवठा केला जाणार आहे.

बेळगाव शहरासाठीची 24 तास पाणीपुरवठ्याची योजना यशस्वीरित्या राबवण्यासाठी सध्या शहरातील वडगाव, मृत्युंजयनगर, उद्यमबाग गणेशपुर -2, कलमेश्वरनगर, देवराजे अर्स कॉलनी, कणबर्गी व कावेरीनगर या ठिकाणी 9 जलकुंभांची उभारणी केली जात आहे. पहिल्या टप्प्यात वडगाव, मृत्युंजयनगर व उद्यमबाग येथील जलकुंभ पूर्ण होणार असून फेब्रुवारीपर्यंत त्यांचे काम पूर्ण केले जाणार आहे. त्यानंतर उर्वरित तीन जल कुंभाचे काम जुलै 2023 अखेरपर्यंत पूर्ण केले जाणार आहे. बेळगाव शहराला राकसकोप व हिडकल जलाशयातून पाणीपुरवठा केला जातो.

बेळगाव शहराची लोकसंख्या सुमारे पाच लाखापर्यंत असून शहरात सध्या 72 हजार नळ जोडणी आहे. याखेरीज 24 तास पाणीपुरवठा योजनेअंतर्गत 61 हजार घरांना नळ जोडणी केली जाणार आहे. शहरातील 10 प्रभागांमध्ये 24 तास पाणीपुरवठा होणार असून सध्या विविध ठिकाणी खोदाई करून जलवाहिनी घालण्याचे काम सुरू आहे.

सदर काम पार पाडण्यासाठी दररोज सुमारे 300 कर्मचारी कार्यरत आहेत. दरम्यान, एल अँड टी कंपनीकडून बेळगाव शहराला 24 तास पाणीपुरवठा करण्याचे काम गतीने सुरू आहे.

बेळगाव शहरात विविध ठिकाणी पाण्याचे 9 मोठे जलकुंभ बसविले जात आहेत. जून 2025 पर्यंत बेळगाव शहरातील 24 तास पाणीपुरवठ्याचे काम पूर्ण होईल, अशी माहिती एल अँड टी कंपनीचे व्यवस्थापकीय संचालक हार्दिक देसाई यांनी दिली आहे.

 belgaum

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.