मराठा रजक समाज बेळगाव या संस्थेतर्फे सुरेंद्र शिवाजीराव अनगोळकर फाउंडेशनचे संस्थापक समाजसेवक अध्यक्ष सुरेंद्र अनगोळकर यांना उत्कृष्ट सामाजिक कार्याबद्दल ‘श्री गाडगेबाबा गौरव पुरस्कार’ देऊन नुकतेच सन्मानित करण्यात आले.
शहापूर हुलबत्ते कॉलनी येथील श्री गाडगेबाबा भवन येथे मराठा रजक समाजातर्फे गेल्या मंगळवारी श्री संत गाडगेबाबांची 66 वी पुण्यतिथी साजरी करण्यात आली. या निमित्ताने श्री गाडगेबाबा गौरव पुरस्कार वितरणाचे ही आयोजन करण्यात आले होते.
महाराष्ट्र परीट धोबी सेवा मंडळ प्रदेशाध्यक्ष राजेंद्र शेठ यशवंतराव खैरनार यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या समारंभास प्रमुख पाहुणे म्हणून सुधीर खैरनार, रमेश जाधव, मराठा रजक समाज बेळगावचे अध्यक्ष विठ्ठल भरमा पाळेकर, उपाध्यक्ष मयूर चव्हाण, सेक्रेटरी राजू यादव आदी व्यासपीठावर उपस्थित होते. यावेळी सामाजिक कार्यकर्ते सुरेंद्र शिवाजीराव अनगोळकर यांचा उल्लेखनीय समाजकार्याबद्दल शाल, श्रीफळ आणि श्री गाडगेबाबा गौरव पुरस्कार देऊन गौरविण्यात आले.
सत्कारबद्दल कृतज्ञता व्यक्त करून थोडक्यात आपल्या कार्याची माहिती देण्याबरोबरच सत्कारमूर्ती सुरेंद्र अनगोळकर यांनी उपस्थितांना समाजकार्याबद्दल मार्गदर्शन करून प्रोत्साहित केले.
याप्रसंगी मराठा रजक समाजाचे उपसिक्रेटरी सदानंद साळुंखे, खजिनदार आनंद परीट, श्रीधर लोकळे, अशोक जाधव, मगाण्णा पाळेकर, राकेश किल्लेकर, ज्योतिबा उपर्डेकर, रवी मडिवाळ, रमेश जाधव, विक्रम किल्लेकर, तानाजी जाधव, सतीश लोकळे, प्रेमा पाटील, शुभांगी पवार आदींसह बहुसंख्य समाज बांधव आणि हितचिंतक उपस्थित होते.