Wednesday, December 25, 2024

/

खानापुरात समितीच्या एकिसाठी सूचक हालचाली

 belgaum

गेल्या वर्षभरापासून या ना त्या कारणाने फिस्कटत असलेली खानापूर तालुका महाराष्ट्र एकीकरण समितीच्या दोन्ही गटांमधील एकीचा प्रक्रियेला पुन्हा एकदा वेग आला असून एकीच्या घडामोडींना सुरुवात झाली आहे.

शनिवारी महाराष्ट्र एकीकरण समितीच्या दोन्ही गटातील नेत्यांनी बेळगावात मध्यवर्ती महाराष्ट्र एकीकरण समितीच्या नेत्यांची भेट घेत चर्चा केली आहे त्यानंतर खानापूर समितीत देखील एकी होण्याचे सुचक संकेत मिळाले आहेत.

लवकरच मध्यवर्ती महाराष्ट्र एकीकरण समितीच्या माध्यमातून खानापूर तालुक्यातील दोन्ही गटात एकोपा घडवून आणला जाणार आहे.

आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर खानापूर तालक्यातील समितीत एकीची गरज व्यक्त होत होती, आणि यासाठी प्रयत्न सुरू होते.

बेळगाव तालुका समितीतील दोन्ही गटांत एकीनंतर खानापुर समितीत देखील एकीची गरज आहे तसे संकेत देखील मिळत आहेत,आणि मध्यवर्ती समिती कडून लवकरच खानापूरचा दौरा
केला जाणार आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.