स्टेट मास्टर्स स्वीमर्स या जलतरण स्पर्धेत बेळगावच्या जलतरणपटूंनी सर्वोत्कृष्ट कामगिरी करत बेळगावच्या शिरपेचात मनाचा तुरा रोवला आहे. बेंगळुरू येथील कार्पोरेशन जलतरण तलाव, विजयनगर येथे नुकत्याच या स्पर्धा पार पडल्या आहेत.
या स्पर्धेत बेळगावच्या जलतरणपटूंनी १२ सुवर्ण, १४ रौप्य आणि २ कांस्य पदकांसह एकूण २७ पदके जिंकून यश मिळविले आहे.
या स्पर्धेत सोनाली पाटील (वयोगट ३० -३४ ) ४ सुवर्ण, २ रौप्य, लक्ष्मण कुंभार (वयोगट ७५ -७९ ) ३ सुवर्ण, रिदम त्यागी (वयोगट ४० – ४४ ) २ सुवर्ण, २ रौप्य, जगदीश गस्ती (वयोगट ४० -४४ ) १ सुवर्ण, ४ रौप्य, अरुंधती साखरे (वयोगट ३५ -३९) १ सुवर्ण,
४ रौप्य, बलवंत पत्तार (वयोगट ७५ -७९ ) १ सुवर्ण, २ रौप्य, २ कांस्य अशी एकूण २७ पदके जिंकली आहेत. २५ ते ९५ वयोगटातील स्पर्धकांनीही उत्स्फूर्त सहभाग घेत निरोगी आरोग्याचा संदेश दिला आहे. या सर्व जलतरणपटूंची आगामी १८ व्या मास्टर्स स्पर्धेसाठी निवड करण्यात आली आहे. राष्ट्रीय जलतरण चॅम्पियनशिप २०२२ हि स्पर्धा अंबाला येथे वॉर हिरो मेमोरेबल स्टेडियमवर २५ ते २७ नोव्हेंबर दरम्यान होणार आहे.
हे सर्व स्पर्धक केएलई संस्थेच्या जलतरण तलावात उमेश कलघटगी, अजिंक्य मेंडके, अक्षय शेरेगार, नितीश कुडूचकर आणि गोवर्धन काकतकर यांच्या प्रशिक्षणाखाली तयार झाले असून वरील सर्व यशस्वी जलतरणपटूंना के एल इ संस्थेचे कार्याध्यक्ष डॉ. प्रभाकर कोरे, स्वीमर्स क्लबचे संस्थापक सदस्य अविनाश पोतदार, माकी कपाडिया, लता कित्तूर, सुधीर कुसणे यांचेही प्रोत्साहन लाभले आहे.