कर्नाटक रोलर स्केटिंग असोसिएशनतर्फे आयोजित 38 व्या राज्य रोलर स्केटिंग चॅम्पियनशिप 2022 मध्ये बेळगाव जिल्हा रोलर स्केटिंग असोसिएशनच्या स्केटर्सनी घवघवीत यश मिळवताना 14 सुवर्णपदकांसह एकूण 35 पदके हस्तगत केली.
कर्नाटक रोलर स्केटिंग असोसिएशनने गेल्या 16 ते 20 नोव्हेंबर 2022 या कालावधीत 38 व्या राज्य रोलर स्केटिंग चॅम्पियनशिपचे आयोजन केले होते. या चॅम्पियनशिपमध्ये जवळपास 800 स्केटरस सहभागी झाले होते. त्यामध्ये बेळगाव जिल्हा रोलर स्केटिंग असोसिएशनच्या स्केटिंग पटूंनी 14 सुवर्ण, 9 रौप्य व 12 कांस्य अशी एकूण 35 पदके मिळविली. सदर यशस्वी जलतरणपटू पुढील प्रमाणे आहेत. स्पीड स्केटिंग : आराध्या पी -3 सुवर्ण. प्रांजल पाटील -1 रौप्य, 1 कांस्य. आर्या कदम -1 रौप्य, 1 कांस्य. जान्हवी तेंडुलकर -1 रौप्य. आराध्या मोरे -1 रौप्य, 2 कांस्य. उत्पेक्षा नवलाई -1 कांस्य. श्री रोकडे -1 कांस्य. अवनीश कामन्नवर -1 कांस्य. सौरभ साळोखे -1 कांस्य. जियान आली तांबोळी -1 कांस्य. साक्षी रामणकट्टी -1 कांस्य.
फ्रीस्टाईल स्केटिंग : अवनीश कोरीशेट्टी -2 सुवर्ण. श्रीयांश नामगौडर -1 रौप्य. जयध्यान राज -1 सुवर्ण, 1 रौप्य. रश्मिता अंबिगा -2 सुवर्ण. देवेन बामणे -1सुवर्ण, 1 रौप्य. तुलसी हिंडलगेकर -1 रौप्य. प्रिती नवले -1 कांस्य. अभिषेक नवले -1 सुवर्ण. भरत पाटील – 1 रौप्य, 1 कांस्य. अल्पाइन आणि डाउनहिल स्केटिंग : साईराज मेंडके -2 सुवर्ण. अमेय याळगी -1 सुवर्ण. शुभम साखे -1 सुवर्ण.
उपरोक्त सर्व स्केटर्स केएलई सोसायटीच्या स्केटिंग रिंक, कॉर्पोरेशन स्पोर्ट्स अकादमी स्केटिंग रिंक आणि गुड शेफर्ड सेंट्रल स्कूल इंटरनॅशनल स्केटिंग ट्रॅकवर सराव करत करतात.
त्याना डॉ. प्रभाकर कोरे, शाम घाटगे, माजी आमदार रमेश कुडची, राज घाटगे व केआरएसए सरचिटणीस इंदुधर सीताराम, बेळगाव जिल्हा रोलर स्केटिंग असोसिएशन अध्यक्ष उमेश कलघटगी आणि प्रसाद तेंडुलकर याचे प्रोत्सlहन लाभत असून स्केटिंग प्रशिक्षक सूर्यकांत हिंडलगेकर, योगेश कुलकर्णी, मंजुनाथ मंडोळकर, विशाल वेसने, विठ्ठल गगणे, गणेश, सक्षम जाधव व सोहम हिंडलगेकर यांचे मार्गदर्शन लाभत आहे.