Saturday, December 21, 2024

/

आता टॅक्सी, रिक्षा चालकांच्या मुलांनाही शिष्यवृत्ती

 belgaum

विणकर आणि शेतकऱ्यांच्या मुलांना मिळणाऱ्या विद्यानिधी योजनेत आता टॅक्सी आणि रिक्षा चालकांच्या मुलांचा समावेश करण्यात आला आहे. यलो बोर्ड प्रवासी रिक्षा आणि टॅक्सी चालकांच्या मुलांना दहावीनंतरच्या उच्च शिक्षणासाठी शासनाकडून शिष्यवृत्ती घोषित झाली आहे.

विद्यानिधी योजनेअंतर्गत शिष्यवृत्ती मिळण्यासाठी गेल्या 8 नोव्हेंबरपासून ऑनलाईन अर्ज स्वीकारण्यास सुरुवात झाली आहे. सेवा सिंधू संकेतस्थळावर यासाठी अर्ज दाखल केला जाऊ शकतो. विद्यार्थी आपल्या नजीकच्या ग्राम वन, कर्नाटक वन, सीएससी केंद्रातून यासाठी ऑनलाईन अर्ज दाखल करू शकतात. अर्ज करताना विद्यार्थी दहावीनंतरचे शिक्षण घेत असावा. तसेच चालकाचा परवाना, आधार संख्या, विद्यार्थी आधार संख्या ऑनलाइन दाखल करावी लागणार आहे. शिष्यवृत्ती मिळण्यासाठी येलो बोर्ड चालकांची प्रादेशिक परिवहन मंडळात सारथी तंत्रांशमध्ये नोंद असावी. तसेच त्याची कुटुंब तंत्रांशामध्ये कुटुंबाची संपूर्ण माहिती असावी. चालकाच्या कुटुंबातील प्रत्येक सदस्य ही शिष्यवृत्ती मिळण्यास पात्र ठरू शकतो.

विद्यार्थ्यांना मिळणाऱ्या शिष्यवृत्तीचे स्वरूप पुढीलप्रमाणे आहे. पदवी पूर्व आयटीआय डिप्लोमा अभ्यासक्रम : विद्यार्थी 2500 रु., विद्यार्थिनी 3000 रु. बीए, बीएससी, बीकॉम अभ्यासक्रम : विद्यार्थी 5000 रु., विद्यार्थिनी 5500 रु. एलएलबी,

पॅरामेडिकल, बी -फार्मा, नर्सिंग आदी व्यावसायिक कोर्स : विद्यार्थी 7500 रु., विद्यार्थिनी 8000 रु. एमबीबीएस, बीई, बी -टेक व इतर पदव्युत्तर अभ्यासक्रम : विद्यार्थी 10000 रु., विद्यार्थिनी 11000 रुपये.

विद्यार्थ्यांची ऑनलाइन नोंद झाल्यानंतर विद्यार्थ्यांच्या बँक खात्यावर दरवर्षी थेट ही शिष्यवृत्ती जमा केली जाणार आहे. अधिक माहितीसाठी सेवा सिंधू संकेतस्थळाला भेट द्यावी, असे आवाहन करण्यात आले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.