केपीसीसी कार्याध्यक्ष आणि आमदार सतीश जारकीहोळी यांनी निपाणी येथे मानव बंधुत्व वेदिकेच्या कार्यक्रमात ‘हिंदू’ या शब्दावरून वादग्रस्त विधान केले. या विधानानंतर कर्नाटकासह संपूर्ण देशभरात संतप्त प्रतिक्रिया व्यक्त होऊ लागल्या.
दरम्यान, सतीश जारकीहोळींनी मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांना पत्र लिहिले असून “आपण केलेल्या विधानावर तपास पथक स्थापण्याची मागणी केली आहे. शिवाय आपल्या बोलण्यामागे कुणाच्याही भावना दुखावण्याचा आपला हेतू नव्हता. जर कुणाच्या भावना दुखावल्या गेल्या असतील तर मी माझे शब्द मागे घेतो” असेही पत्रात नमूद करण्यात आले आहे.
सतीश जारकीहोळी यांनी केलेल्या विधानानंतर, या मुद्द्यावरून विरोधकांनी त्यांना कोंडीत अडकवण्याचा प्रयत्न केला असून सतीश जारकीहोळी यांना हे विधान भलतेच महागात पडल्याचे चित्र दिसून येत आहे.
के पी सी सी कार्याध्यक्ष सतीश जारकिहोळी यांनी हिंदू या शब्दाबद्दल केलेल्या वक्तव्याचा निषेध करत बेळगावात भाजपने जोरदार निदर्शने केली.बुधवारी दुपारी बाराच्या दरम्यान कित्तूर राणी चन्नम्मा चौकात तब्बल दीड तासाहून अधिक काळ चक्का जाम करत आंदोलन केले.
भाजपच्या कार्यकर्त्यांनी सतीश यांच्या वर कारवाईची मागणी करत सतीश यांच प्रतीकात्मक पुतळ्याची प्रेतयात्रा काढत दहन केले होते