बेळगाव जिल्ह्यातील रेणुका शुगर्स या साखर कारखाने शेतकऱ्यांच्या ऊसाला प्रति टन 3660 रुपये इतका दर घोषित केला असून यंदा दक्षिण भारतातील प्रति टन ऊसाला मिळालेला हा सर्वाधिक दर आहे.
महाराष्ट्रातील एका अग्रगण्य वृत्तवाहिनीने सदर माहिती देणारे वृत्त प्रसिद्ध केले आहे.
उत्तर कर्नाटकातील विशेष करून बेळगाव जिल्ह्यातील शेतकरी संघटनांतर्फे यंदाच्या हंगामातील उसाला सरकार व कारखानदारांनी प्रति टन 5500 दर द्यावा यासाठी आंदोलन हाती घेण्यात आले आहे.
या पार्श्वभूमीवर रेणुका शुगर्सने प्रति टन ऊसाला 3660 रुपये दर घोषित करून ऊस दरासंदर्भातील आपली भूमिका स्पष्ट केली आहे.