बस सेवा सुरळीत करा या मागणीसाठी बेळगाव तालुक्यातील हुदली येथील विद्यार्थ्यांनी आंदोलन केले. आंदोलक विद्यार्थी आणि राज्य परिवहन महामंडळाच्या कर्मचाऱ्यांमध्ये वादावादी निर्माण होऊन तणावाचे वातावरण निर्माण झाले होते.
सोमवारी सकाळच्या सत्रात हे आंदोलन झाले दररोज सकाळी हुदली हून बेळगावकडे येणाऱ्या विद्यार्थी आणि नागरिकांची संख्या अधिक असते मात्र बसचा तुटवडा असल्याने त्यांना त्रास सहन करावा लागत आहे.
हुदली क्रॉस जवळ विद्यार्थ्यांनी अनेक बसचा रोको करून आंदोलन केलं यावेळी ये जा करणाऱ्या अनेकाना याचा त्रास सहन करावा लागला.
हुदली कडून बेळगाव कडे येणाऱ्या प्रवासांची संख्या अधिक आहे मात्र बसचा कमतरता असल्याने येजा करणाऱ्या प्रवाशांना त्रास सहन करावा लागत आहे ग्रामस्थांनी राज्य परिवहन महामंडळाकडे याची मागणी केली असता असता केवळ आश्वासन मिळत आहेत त्यामुळे संतप्त विद्यार्थ्यांनी सकाळी बस रोको आंदोलन करून निदर्शने केली.
केवळ हुदली नव्हे तर बेळगाव तालुक्यातील अनेक गावांमध्ये अनियमित बस सेवा आहे अनेक ठिकाणी विद्यार्थी बस मधून लोंबकळत ये जा करत असतात अशावेळी राज्य परिवहन महामंडळाने वेळेत बस सुविधा पुरवाव्यात अशी देखील मागणी यानिमित्ताने वाढू लागली आहे.
राज्य परिवहन महामंडळाच्या बेळगाव डेपोत नव्याने बसची संख्या वाढवायला हवी त्यासाठी स्थानिक लोकप्रतिनिधीकडून प्रयत्न होणे गरजेचे आहे.नवीन रुजू झालेल्या बस केवळ दक्षिण कर्नाटकसाठी असतात उत्तर कर्नाटक बेळगाव साठी जुन्या बस पाठवल्या जातात असा देखील आरोप नेहमीच ऐकायला मिळतो मात्र कमी बस असल्याचा फटका स्थानिक लोकांना बसत आहे.