बेळगावात होणाऱ्या कर्नाटक सरकारच्या हिवाळी अधिवेशनाच्या कालावधीमध्ये कपात करण्यात आली असून दरवर्षी 2 आठवडे चालणाऱ्या या अधिवेशनाच्या कालावधीत तीन दिवसाची कपात करण्यात आली आहे. त्यामुळे यंदाचे अधिवेशन 9 दिवसाचे असणार आहे.
कर्नाटक विधिमंडळाचे हिवाळी अधिवेशन येत्या 19 ते 29 डिसेंबर दरम्यान बेळगाव सुवर्ण विधानसभेत येथे होणार असल्याचे जाहीर करण्यात आले आहे हे अधिवेशन 12 दिवसांचे घोषित करण्यात आले असले तरी प्रत्यक्षात कामकाज 9 दिवस चालणार आहे.
अधिवेशनाला सोमवारी प्रारंभ झाल्यानंतर पहिल्या सत्रात ते शुक्रवारपर्यंत म्हणजे 23 डिसेंबरपर्यंत चालेल त्यानंतर शनिवार आणि रविवार असे दोन दिवस सुट्टी राहणार आहे.
दुसऱ्या सत्रात सोमवार दि 25 डिसेंबरपासून पुन्हा अधिवेशन सुरू होईल आणि त्याची सांगता गुरुवारी 19 डिसेंबर रोजी होणार आहे. त्यामुळे प्रत्येक शाळेत अधिवेशन 11 दिवसांसाठी घोषित झाले असले तरी त्याचे कामकाज मात्र फक्त 9 दिवस चालणार आहे. यावरून बेळगाव तेथील अधिवेशन सरकारकडून केवळ औपचारिकता म्हणून घेतले जात असल्याचे दिसते.
बेळगावमध्ये या यापूर्वीही अधिवेशन भरवल्यामुळे या भागाचे कोणतेही कल्याण झालेले नाही किंवा अपेक्षित विकासही झालेला नाही. त्यामुळे यावेळी 9 दिवसांच्या कालावधीत बेळगाव भागातील विषयांवर चर्चेसाठी किती वेळ दिला जातो हे पहावे लागेल.