ट्रकच्या ठोकरीने इसम गंभीर जखमी

0
4
Man injured
 belgaum

ट्रकने ठोकल्याने रस्त्यावरून जाणारा एक इसम गंभीर जखमी झाल्याची घटना आज मंगळवारी सकाळी छ. शिवाजी उद्यानासमोरील एसपीएम रोड मार्गावर घडली.

गेल्या कांही महिन्यांमध्ये शहरातील अवजड वाहनांच्या वाहतुकीमुळे बरेच अपघात घडले असून काहींना त्यात प्राणही गमवावे लागले आहेत.

मात्र अद्यापही शहरातील अवजड वाहनांच्या वाहतुकीवर बंदी घालण्यात आलेली नाही अथवा घालण्यात आलेल्या बंदीची काटेकोर अंमलबजावणी केली जात नाही.

 belgaum

परिणामी ट्रकने ठोकल्याने एक इसम गंभीर जखमी झाल्याची घटना आज सकाळी 7:30 वाजण्याच्या सुमारास शहापूर छत्रपती शिवाजी उद्यानासमोरील एसपीएम रोड रस्त्यावर भेटली. अपघाताची माहिती मिळताच श्रीराम सेना हिंदुस्तानच्या कार्यकर्त्यांनी घटनास्थळी धाव घेऊन मदत कार्य हाती घेतले.Man injured

तसेच आपल्या संघटनेच्या रुग्णवाहिकेतून पायाला गंभीर दुखापत झालेल्या त्या जखमी इसमास तातडीने विजया हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी दाखल केले. जखमी इसमाचे नाव श्रीराम स्वामी असे असल्याचे कळते.

आज सकाळच्या या अपघातामुळे पोलीस प्रशासनाने गांभीर्याने दखल घेऊन शहरातील अवजड वाहनांची वाहतूक तात्काळ बंद करावी, अशी मागणी पुन्हा जोर धरू लागली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.