सारस्वत प्रकाशन, मुंबई या संस्थेतर्फे गेली ३७ वर्षे सारस्वत चैतन्य त्रैमासिक अखंडितपणे सुरू आहे. या संस्थेतर्फे दरवर्षी सारस्वत चैतन्य गौरव सोहळा साजरा केला जातो. यावर्षीचा गौरव सोहळा रविवार दि. २० नोव्हेंबर २०२२ रोजी सकाळी १० वा. श्री विद्याधिराज सभागृह, श्री संस्थान गोकर्ण पर्तगाळी जीवोत्तम मठ, १०११/ए रामनगर, बेळगाव येथे संपन्न होणार आहे.
या सोहळ्याला माननीय आर. व्ही. देशपांडे (आमदार, ज्येष्ठ समाजसेवक), हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार आहेत. तसेच माननीय श्री. आर. डी. शानभाग (सुप्रसिद्ध वास्तुरचनाकार व अभियंता) व मा. श्री. किशोर रांगणेकर (शैक्षणिक, बँकिंग व सामाजिक क्षेत्रातील ज्येष्ठ व्यक्तिमत्त्व) हे विशेष अतिथी म्हणून उपस्थित राहणार आहेत.
यावेळी गौड सारस्वत ब्राह्मण समाजातील विविध क्षेत्रातील कर्तृत्ववान व्यक्तींचा गौरव केला जाणार आहे.
डॉ. राजन देशपांडे (समाजाभिमुख वैद्यकीय सेवेचा आदर्श-सारस्वत प्रकाशन विशेष पुरस्कार), श्री. सचिन सबनीस (प्रथितयश उद्योजक व समाजसेवक-समाजसेवक कै. रवींद्र पाटकर स्मृती पुरस्कार), पं. उपेंद्र भट (हिंदुस्थानी शास्त्रीय संगीत क्षेत्रातील लक्षवेधी योगदान – कै. सौ. प्रमोदिनी व कै. डॉ. प्रभाकर वा. रेगे स्मृती पुरस्कार), श्री. प्रसाद पंडित (चतुरस्र अभिनेता- कै. एम. एन. देसाई स्मृती पुरस्कार), डॉ. माधव प्रभू (वैद्यकीय व सामाजिक क्षेत्रातील योगदान – सारस्वत प्रकाशन विशेष सत्कार), श्रीमती विजया तेलंग (मराठी व कन्नड साहित्य क्षेत्रातील लक्षणीय योगदान- सारस्वत प्रकाशन विशेष सत्कार) या गौड सारस्वत ब्राह्मण समाजातील विविध क्षेत्रातील कर्तृत्ववान व्यक्तींचा गौरव केला जाणार आहे. तसेच कु. आमोद शानभाग (विशेष क्रीडा नैपुण्य – कै. एन. व्ही. गुंजीकर विशेष गुणवत्ता पारितोषिक) या विद्यार्थ्यास पारितोषिक देऊन गौरविले जाणार आहे.
२००१ पासून सारस्वत चैतन्य गौरव सोहळा सुरू आहे. २०१६ पर्यंत मुंबई आणि त्यानंतर २०१७ पुणे, २०१८ डोंबिवली, २०१९ कुडाळ, २०२० कोल्हापूर, २०२१ मुंबई येथे संपन्न झाला. आणि यावर्षी २० नोव्हेंबर २०२२ रोजी बेळगाव येथे होणार आहे. आजवरील सोहळ्यात १७० हून अधिक कर्तृत्ववान व्यक्ती, सामाजिक संस्था, विद्यार्थी यांचा गुणगौरव करण्यात आला आहे. आजवरील सोहळ्याला प्रमुख पाहुणे व विशेष अतिथी म्हणून अनेक मान्यवर लाभले. त्यातील काही ठळक नावे.
ज्योतिर्भास्कर जयंतराव साळगावकर, पद्मश्री मधु मंगेश कर्णिक, रवींद्र पिंगे, सुमन कल्याणपूर, एकनाथ ठाकूर, प्रदीप नाईक, भरत दाभोळकर, रत्नाकर मतकरी, विठ्ठल कामत, जयवंत मंत्री, वासुदेव कामत, गौतम ठाकूर, किशोर रांगणेकर. तर गौरवमूर्ती म्हणून विविध क्षेत्रातील अनेक कर्तृत्ववान व्यक्तींचा सन्मान करण्यात आला. त्यातील काही ठळक नावे. पद्मविभूषण डॉ. अनिल काकोडकर, पद्मभूषण डॉ. नंदकिशोर लाड, पद्मभूषण गौतम राजाध्यक्ष, पद्मभूषण मंगेश पाडगांवकर, माधव मंत्री, पद्मभूषण डॉ. जी. बी. परुळकर, डॉ. प्रेमानंद रामाणी, गिरिजा कीर, संगीतकार अशोक पत्की, उषा नाडकर्णी, अशोक सराफ, डॉ. विठ्ठल प्रभू, इत्यादी अनेकांचा समावेश आहे.
यंदाचा हा गौरव सोहळा गौड सारस्वत ब्राह्मण समाज, शहापूर-बेळगाव आणि श्री संस्थान गोकर्ण पर्तगाळी जीवोत्तम मठ या संस्थांच्या सहकार्याने संपन्न होणार आहे.
यावेळी बेळगाव येथील श्री कवळे मठ लोकल कमिटी, श्री पर्तगाळी मठ लोकल कमिटी, चित्रापूर सारस्वत समाज, राजापुरी सारस्वत लोकल कमिटी, हरिगुरु सेवा मंडळ, सारस्वत सेवाभावी संघ, राजस्थानी सारस्वत इत्यादी स्थानिक संस्थांचे पदाधिकारी, प्रतिनिधी तसेच कोल्हापूरहून सारस्वत विकास मंडळ, सारस्वत बोर्डिंग, मुंबईहून जीएसबी टेंपल ट्रस्ट, ऑल इंडिया सारस्वत कल्चरल ऑर्गनायझेशन,सारस्वत ब्राह्मण समाज, सारस्वत दीनवत्सल संघ, बारदेशकर गौड सारस्वत ब्राह्मण निधी, सारस्वत हितवर्धक मंडळ, मोतीबेन दळवी हॉस्पिटल,गौड ब्राह्मण सभा,
गौड सारस्वत को ऑपरेटिव्ह सोसायटी लि. मुंबई या संस्थेचे पदाधिकारी, प्रतिनिधी उपस्थित राहणार आहेत.
या समारंभास अधिकाधिक ज्ञातिजनांनी उपस्थित राहून सारस्वत तितुके मेळवावे व सारस्वत यश मिरवावे अशा ध्येयाने प्रेरित झालेल्या आमचा उत्साह वाढवावा व समारंभाची शोभा वृध्दिंगत करावी, असे आवाहन सारस्वत प्रकाशनचे अध्यक्ष दिलीप भिसे व ‘सारस्वत चैतन्य’चे संपादक सुधाकर लोटलीकर यांनी केले आहे.
अधिक माहितीसाठी-राहुल साखळकर, मुंबई (8108018989), राघव हेरेकर, बेळगाव (9845245812) यांच्याशी संपर्क साधावा.
संस्थेची संक्षिप्त माहिती
सकल सारस्वत समाजाचे प्रतिबिंब अशा ओळखीने सारस्वत समाजाच्या घराघरात स्थान मिळविण्यात सारस्वत चैतन्य त्रैमासिक यशस्वी झाले आहे. १० एप्रिल १९८६ रोजी पहिल्या अंकाचे प्रकाशन झाले.
गेल्या ३७ वर्षात अखंडितपणे १४७ अंकांचे प्रकाशन. गौड सारस्वत ब्राह्मण, सारस्वत ब्राह्मण किंवा गौड ब्राह्मण अशा नामसाधर्म्याने आठनऊ ज्ञातिघटकांत विभागलेल्या परंतु संस्कार व संस्कृतीने ऐक्य दर्शविणा-या ज्ञातिजनांचे ऐक्य दृष्टीसमोर ठेवून वाटचाल.
१९९४ मध्ये गौड सारस्वत समाज परिचय ग्रंथाचे प्रकाशन
१९९६: मुंबईत एक दिवसीय जीएसबी संमेलन
२००३ : सारस्वत : भारतीय संस्कृतीचे उपासक
(लेखक : गो. मं. लाड) या पुस्तकाचे प्रकाशन
२०१७ : ‘मी’ ची शोधयात्रा, पुस्तकाचे प्रकाशन, लेखक : अशोक ज. सिनकर
२०१९: सारस्वत परिचय. दोन हजारहून अधिक आडनावांची, गोत्र, ज्ञातिघटक, कुलदैवत व त्यांचे ठिकाण याविषयी तसेच कुलदैवत, ज्ञातिमठ यांची इंग्लिश मराठीत माहिती देणाऱ्या पुस्तकाचे प्रकाशन
अधिक माहितीसाठी
सारस्वत प्रकाशन कार्यालय मो. नं. ८७७९७५८०८५ वर संपर्क साधू शकता. ई मेल
[email protected]
वेबाईट: Saraswatchaitanya.org