‘लंपी स्किन’चा प्रादुर्भाव नियंत्रणाखाली ठेवण्याबरोबरच वैद्यकीय उपचार, लसीकरण आणि वैद्यकीय साहित्य खरेदीसाठी राज्य सरकारकडून बेळगाव जिल्ह्याला 10 कोटी रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे. या निधीद्वारे लसीकरणाचा टक्का वाढवण्यासह रोग नियंत्रणाखाली ठेवण्यासाठी व्यापक प्रयत्न सुरू आहेत.
गेल्या कांही दिवसांपासून लंपी स्कीनमुळे जनावरे आजारी पडत असून अनेक जनावरे दगावले आहेत. यामुळे या संदर्भात युद्धपातळीवर रोग नियंत्रणासाठी प्रयत्न सुरू आहेत. त्याचाच भाग म्हणून जिल्ह्यात जागृती कार्यक्रम लसीकरण आणि वैद्यकीय तपासणी केली जात आहे.
निधीमुळे लसीकरणाचा टक्का वाढल्यामुळे लंपी स्कीन आजार नियंत्रणाखाली आहे. मात्र त्यावर पूर्ण नियंत्रण आणण्यासाठी 100 टक्के लसीकरण अपेक्षित आहे. त्या दिशेने आता प्रयत्न सुरू असून औषध पुरवठा जागृती आणि लक्षणे जाणविल्यास तातडीने उपचार घेण्याची सूचना आरोग्य विभागाने केली आहे.
या संदर्भात माहिती देताना जिल्हाधिकारी नितेश पाटील म्हणाली की, जिल्ह्यात जनावरांमध्ये लंपी स्कीन आजार बळावत असल्याने विविध उपाय योजना करण्यात आल्या आहेत. व्यापक जागृतीच्या सूचना पशु संगोपन खात्याला केली आहे. तसेच आता राज्य सरकारकडे प्रस्ताव पाठवल्यानंतर 10 कोटी रुपयांचे अनुदान मंजूर करण्यात आले असून या निधीचा विनियोग तालुका आणि विधानसभा मतदारसंघातील जनावरांच्या संख्येनुसार उपचारासाठी केला जाईल असे जिल्हाधिकाऱ्यांनी स्पष्ट केले.
दरम्यान, लंपी स्कीनवर उपचार लसीकरण मोफत असले तरी जनावरे दगावल्यानंतर भरपाई कमी मिळते. याकडे निवेदन देऊन लक्ष वेधले जात आहे. भरपाईच्या रक्कमेत वाढ होणे पशुपालकांकडून अपेक्षित आहे. जनावरांच्या किमती वाढल्या आहेत, त्यानुसार भरपाई मिळावी, अशी मागणी केली जात आहे.