बेळगाव शहराच्या सौंदर्यात भर टाकणाऱ्या किल्ला तलाव परिसरात बालचमूसह नागरिकांच्या मनोरंजनासाठी डायनासोरचे आकर्षक पुतळे बसविण्यात येणार असून त्याचे काम हाती घेण्यात आले आहे. लवकरच हे पुतळे सर्वांना पहावयास मिळणार आहेत.
किल्ला तलाव परिसरात लवकरच डायनासोरचे पुतळे बसविले जाणार आहेत. गेल्या कांही दिवसांपासून तलावाच्या ठिकाणी वेगवेगळ्या आकारातील आकर्षक असे डायनासोरचे पुतळे तयार करण्याचे काम हाती घेण्यात आले आहे.
गेल्या तीन ते चार महिन्यापासून वेगवेगळ्या प्रजातींच्या डायनासोरचे पुतळे निर्माण करण्याचे काम हाती घेण्यात आले आहे. आता लवकरच या पुतळ्यांचे रंगकाम हाती घेतले जाईल.
किल्ला तलाव परिसरात दररोज हजारो लोक फिरावयास येत असतात. तसेच या ठिकाणी येणाऱ्यांमध्ये शालेय मुलांची संख्याही मोठ्या प्रमाणात असते. त्यामुळे या ठिकाणी येणाऱ्या शालेय मुलांना डायनासोर कसा होता? हे जवळून प्रत्यक्ष पाहता येणार आहे.
आतापर्यंत डायनासोरबाबत वेगवेगळ्या प्रकारची माहिती देणारे चित्रपट येऊन गेले आहेत. तसेच पुस्तकातूनही डायनासोर बाबत वेगवेगळ्या प्रकारची माहिती प्रसिद्ध झाली आहे. आता हे डायनासोर विद्यार्थी आणि नागरिकांना लवकरच किल्ला तलाव येथे आकर्षक स्वरूपात पाहता येणार आहेत.