विद्या प्रसारक मंडळाच्या 52 व्या वर्षातील पदार्पणाचा सोहळा भातकांडे स्कूल व केंब्रिज इंटरनॅशनल स्कूलमध्ये विविध स्पर्धा आणि उपक्रमांद्वारे साजरा करण्यात येत आहे.
ज्ञान दिल्याने ज्ञान वाढते. त्या ज्ञानाचे मंदिर हे सत्याशिवाहून सुंदर हे.. अशा या ज्ञान मंदिराचे 52 व्या वर्षात पदार्पण झाले आहे. अखंड 51 वर्षे विद्या प्रसारक मंडळ शिक्षण सेवेत रुजू आहे. 1971 सालापासून बहुजन समाजातील शिक्षणाची कमतरता दूर करण्यासाठी विद्या प्रसारक मंडळाचे बीज रोवले गेले आणि शिक्षणप्रेमी दिवंगत गजाननराव भातकांडे यांनी रोवलेल्या या बीजाचा आता वटवृक्ष झाला आहे. ज्याचा मोठा डोलारा मिलिंद भातकांडे हे सध्या समर्थपणे सांभाळत आहेत. गजाननराव भातकांडे स्कूल ते भातकांडे केंब्रिज इंटरनॅशनल स्कूल असा प्रवास या 51 वर्षाच्या कालावधीत पार पडला आहे.
1972 साली बालवाडीची स्थापना करून भातकांडे यांनी शिक्षण सेवेचा श्री गणेशा सुरू केला. त्यानंतर 1975 मध्ये गजाननराव भातकांडे इंग्रजी माध्यम शाळा सुरू झाली. पुढे 1984 मध्ये माध्यमिक विभाग सुरू करण्यात आला. बहुजन समाजाच्या विकासासाठी सुरू झालेला हा प्रवास सध्याच्या परिस्थितीची गरज ओळखून 2022-23 या शैक्षणिक सालापासून केंब्रिज इंटरनॅशनल स्कूलच्या स्थापनेपर्यंत येऊन पोहोचला आहे.
विद्या प्रसारक मंडळाच्या 52 व्या वर्षातील पदार्पणाचा सोहळा केंब्रिज इंटरनॅशनल स्कूलच्या स्थापनेने साजरा करण्यात आला. मात्र या वर्षभरात वैविध्यपूर्ण कार्यक्रम आणि शाळा स्तरावरील स्पर्धा यांच्या माध्यमातून सोहळ्याचा आनंद द्विगुणीत करण्यात येत आहे. टीचर्स कॉलनी खासबाग येथील केंब्रिज इंटरनॅशनल स्कूलची भव्य इमारत या शाळेच्या शैक्षणिक प्रवासात महत्त्वाची भूमिका बजावत आहे.
विद्या प्रसारक मंडळाच्या शैक्षणिक सेवेत गजाननराव भातकांडे इंग्रजी माध्यम स्कूल, भातकांडे केंब्रिज इंटरनॅशनल स्कूल, गजाननराव भातकांडे कॉमर्स पी.यु. कॉलेज, तारा नर्सरी स्कूल, भातकांडेज नर्सरी स्कूल, भातकांडे स्पोर्ट्स अकॅडमी, महात्मा फुले वसतीगृह या 7 उपशाखा कार्यरत आहेत. भातकांडे केंब्रिज स्कूल ही शैक्षणिक विकासाची पुढची पायरी म्हणून कुंतीनगर, टीचर्स कॉलनी खासबाग येथे प्रशस्त इमारतीत सुरू आहे. जागतिक दर्जाचे शिक्षण उपलब्ध व्हावे यासाठी सदर स्कूल सुरू करण्यात आले आहे.
विद्यार्थ्यांना दर्जेदार शिक्षणाबरोबर उत्तम सुविधा अंतर्गत मैदान स्पोर्ट खोल्या उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. यामुळे गजानन भातकांडे शाळेबरोबर या स्कूलचा विस्तार वाढत आहे. गजाननराव भातकांडे सुवर्ण महोत्सवी विद्यालयाचा एक उपक्रमशील शाळा असा नावलौकिक आहे. एसएसएलसीच्या 100 टक्के निकालाची परंपरा, 1600 हून अधिक विद्यार्थी तसेच नर्सरी, दहावी, बारावी अशा टप्प्याने पूर्ण होणारा शैक्षणिक प्रवास या ठिकाणी उपलब्ध आहे. संस्थेतील 60 शिक्षक वर्ग आणि दर्जेदार शिक्षण यामुळे गजानन भातकांडे स्कूलने गोल्डन जुबली वर्ष पूर्ण केले आहे. विद्या प्रसारक मंडळाचे अध्यक्ष मिलिंद भातकांडे व सेक्रेटरी मधुरा भातकांडे यांचे मार्गदर्शन व प्रोत्साहन संस्थेच्या शैक्षणिक वाटचालीस आणि भरभराटीस महत्त्वाचे ठरत आहे.